बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित काल बीडमध्ये राष्ट्रवादीची जाहीर सभा पार पडली. शरद पवारांना ऐकण्यासाठी या सभेला अफाट गर्दी जमा झाली होती. तर त्याआधी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि रोहित पवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. तर जनक्रांती सेनेचे नेते बबन गिते यांनी ७०० गाड्या घेऊन सभा स्थळी दाखल झालेत. परंतु या सभेला पैसे देऊन गर्दी जमा केल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेही वाचा…शरद पवारांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, ते म्हणाले मी पुन्हा आले, पण…,
शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टिकास्त्र सोडलं. या सभेतून मुंडे निशाण्यावर होते. या सभेला लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली. परंतु या सभेसाठी पैसे वाटल्याचा आरोप भाजपने केला आहे. प्रकाश गडे यांनी यासंदर्भात काही व्हिडीओ ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी बीडमधील सभेला माणसं गोळा करण्यासाठी पैसे वाटप, काल नैराश्य ने गुरफेटलेल्या पवार साहेब च्या बीडमधील सभेला मजूरी देऊन माणसे बोलवण्यात आली. काय परिस्थिती आली यांच्यावर, शरद पवार ही कर्माचे फळे आहेत असंही म्हटलंय.
हेही वाचा…“सत्तेसाठी काहीपण ही भूमिका महाराष्ट्रात दोनदा दिसली”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
दरम्यान, पैसे देऊन लोकांची गर्दी केली जात असल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. तर अक्का तिकडे साहेबांच्या सभेसाठी गर्दी गोळा करण्यासाठी पैसे वाटत होती. साहेबांची एवढीच इज्जत राहिली का ? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
बीड मधील सभेला माणसं गोळा करण्यासाठी पैसे वाटप!
काल, नैराश्य ने गुरफेटलेल्या @PawarSpeaks च्या बीड मधील सभेला मजुरी देऊन माणसे बोलवण्यात आली.
काय परिस्थिती आली यांच्यावर, शरद पवार ही कर्माचे फळे आहेत तुमच्या. pic.twitter.com/tzSekhX7ar
— Prakash Gade (@PrakashGade13) August 18, 2023
अक्का तिकडे पवार साहेबांच्या सभेसाठी गर्दी गोळा करण्यासाठी पैसे वाटत होती, अक्का पवार साहेबांची एवढीच इज्जत राहिली का?
पैसे देऊन माणसं आणावा लागत आहे..? @PawarSpeaks pic.twitter.com/6alEA4N9BP
— Prakash Gade (@PrakashGade13) August 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक स्थगित, विद्यार्थी सेना आक्रमक
हेही वाचा…बीड जिल्ह्यात शरद पवारांची मोठी पेरणी , मुंडेंसह भाजपला मोठं आव्हान, चार बड्या नेत्याचा पक्षप्रवेश
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू
हेही वाचा…“याआधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आलंय”
हेही वाचा…बीडची सभा राष्ट्रवादीच्या तरूण नेत्यांनी गाजवली, शरद पवार मैदानात, पुढच्या सभांचा कार्यक्रम ठरला