बीड : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवारांची येवल्यानंतर बीडमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी जात असतांना रस्त्या रस्त्यावर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे जोरदार स्वागत केलं. या बीडच्या सभेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांसमोर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लागवला आहे.
हेही वाचा…“फडणवीस, बावनकुळेंच्या भाजपच्या 2 वरिष्ठांसोबत तब्बल 7 तास चर्चा, फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना”
पहाचे शपथविधी वेळी मी पहिला आमदार होतो, तेव्हा भूमिका स्पष्ट केली होती. आता पण शपथविधीनंतर पहिल्यांदा मी स्पष्ट सांगितले. आम्ही पवार साहेब यांच्या बरोबर आहोत. मी साहेबांमुळे निवडून आलो. असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय. मी आमदार झालो तेव्हा जितके सत्कार झाले नाही, तिकडे पवार साहेब यांना पाठिंबा जाहीर झाल्यावर सत्कार झाले. पवार साहेबांची जादू आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन ठरला, ३ सप्टेंबरपासून कामाला लागणार
कोणी लोक सोडून गेले तरी फरक पडणार नाही. साहेब, जनता तुमच्या बरोबर आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यापायाशी राहणार असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. काही काही झालं तरी आम्ही पवार साहेब यांच्या बरोबर आहोत… जिल्हा परिषद धुडकुन लावली पण पवार साहेब याना सोडले नाही. बीड जिल्ह्याची जनता स्वाभिमानी आहे. कोणी इकडे तिकडे गेले तरी जनता तुमचे बरोबर राहणार असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार ? नवाब मलिकांनी मांडली आपली भूमिका
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे ६३ बस रद्द,” अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घेतलं धारेवर
हेही वाचा…भाजपसह मोदींची एका सर्व्हेतून झोप उडवली, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ला लोकांची ६५ टक्के पसंती
हेही वाचा…मुंडेंना टक्कर देण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, ७०० गाड्या घेऊन बीडच्या सभेत, आज करणार पक्ष प्रवेश
हेही वाचा…“असे सांगून थांबलो तो अजूनपर्यंत थांबलो,” मंत्रीपदापासून वंचित का राहिलो, गोगावलेंनी सांगितला किस्सा