मुंबई : मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात अटकेत असलेल्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अखेर दोन महिन्यापुरता का होईना जामीन मंजूर झाला आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यातच आता नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? त्याबाबत त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन ठरला, ३ सप्टेंबरपासून कामाला लागणार
नवाब मलिक म्हणाले की, मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काॅंग्रेसबरोबर राहणार आहे. गेल्या १८ महिन्यांच्या काळात माझ्या कुटुंबासह मला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे मलाही त्रास करावा लागला. असं नवाब मलिक यांनी म्हटलं असल्याचं वृत्त टाईम ऑफ इंडियाने दिले आहे.
हेही वाचा…“पवारांनी ‘घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, तरीही २०२४ मध्ये जनता मोदींना साथ देणार”
दरम्यान, सध्याच्या घडीला आरोग्याची काळजी घेणं, हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून मी उपचार घेणार आहे. पुढील महिनाभरात माझी प्रकृती सामान्य होईल, अशी मला आशा आहे. असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे ६३ बस रद्द,” अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घेतलं धारेवर
हेही वाचा…भाजपसह मोदींची एका सर्व्हेतून झोप उडवली, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ला लोकांची ६५ टक्के पसंती
हेही वाचा…मुंडेंना टक्कर देण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, ७०० गाड्या घेऊन बीडच्या सभेत, आज करणार पक्ष प्रवेश
हेही वाचा…“असे सांगून थांबलो तो अजूनपर्यंत थांबलो,” मंत्रीपदापासून वंचित का राहिलो, गोगावलेंनी सांगितला किस्सा
हेही वाचा…“फडणवीस, बावनकुळेंच्या भाजपच्या 2 वरिष्ठांसोबत तब्बल 7 तास चर्चा, फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना”