बीड : येवल्यात झालेल्या सभेनंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये सभा झाली. सुरूवातीला शरद पवारांनी छगन भुजबळ आणि काल धनंजय मुंडेंना टार्गेवर ठेवलं. छत्रपती संभाजीनगरहून बीडच्या दिशेने निघालेल्या शरद पवारांचं जागोजागो जंगी स्वागत करण्यात आलं तर बीड जिल्ह्यात शरद पवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करीत सभेच्या ठिकाणी पोहचलं. सभेतूनही शरद पवारांच्या शिलेदारांनी मुंडेंवर निशाणा साधला.
हेही वाचा…“काहीही झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या पायाशी राहणार”,अन् बीडच्या आमदारांनी शरद पवारांना दिला शब्द
शरद पवार बीडमध्ये आले असता जनक्रांती सेनेचे बबन गिते यांनी ७०० गाड्यांसह शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर बबन गिते यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत धनंजय मुंडेंना आव्हान दिलं. यातच आता आगामी निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवार बबन गिते यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे याचा मोठा फटका मुंडेंना बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार ? नवाब मलिकांनी मांडली आपली भूमिका
बबन गिते यांच्यासह बीड येथील स्वाभिमान सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक सुशीलताई मोराडे, बबन गिते, आणि शिवराज बांगर व मंजूरभाई यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू
हेही वाचा…“याआधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आलंय”
हेही वाचा…बीडची सभा राष्ट्रवादीच्या तरूण नेत्यांनी गाजवली, शरद पवार मैदानात, पुढच्या सभांचा कार्यक्रम ठरला
हेही वाचा…शरद पवारांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, ते म्हणाले मी पुन्हा आले, पण…,
हेही वाचा…“सत्तेसाठी काहीपण ही भूमिका महाराष्ट्रात दोनदा दिसली”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला