मुंबई : एकाबाजूला मुंबईत मोदींच्या विरोधात इंडियाची बैठक होत आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार अजित पवार यांच्याशी बैठक घेत आहेत. यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला असल्याचं राजकीय नेत्यांनी म्हटलं. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपण भाजपच्या विरोधातच लढणार असं म्हटलं. याच पार्श्वभूमीवर आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…बीडची सभा राष्ट्रवादीच्या तरूण नेत्यांनी गाजवली, शरद पवार मैदानात, पुढच्या सभांचा कार्यक्रम ठरला
समुद्रातला तळ मोजला जाईल, पण शरद पवारांच्या डोक्यात काय चालू आहे,? ते मोजणं शक्य नाही. असं होऊ शकतं की भाजपनं पावलं टाकत राष्ट्रवादीचाच गेम केला असेल. पण उलटंही होऊ शकतं. शरद पवारही भाजपचा गेम करतील की काय ? अशा संभ्रमात ही अवस्था असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…शरद पवारांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, ते म्हणाले मी पुन्हा आले, पण…,
दरम्यान, शरद पवारांनी एनडीएसोबत यावं, अशी जोरदार मागणी अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. यासाठी अजित पवार गटाने शरद पवार यांची पक्ष फुटीनंतर चारवेळा भेट घेतली. परंतु काहीही साध्य झालं नाही. यातच वारंवार भेटीमुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात आपली भूमिका मांडलीय.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या सभेला पैसे देऊन लोकांची गर्दी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हेही वाचा…मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक स्थगित, विद्यार्थी सेना आक्रमक
हेही वाचा…बीड जिल्ह्यात शरद पवारांची मोठी पेरणी , मुंडेंसह भाजपला मोठं आव्हान, चार बड्या नेत्याचा पक्षप्रवेश