मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकमध्ये सुरू असलेल्या आखाड्यातून अखेर भाजपने माघार घेतली आहे. हा निर्णय म्हणजे खरतर भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. या निवडणुकीसाठी सुरू असलेले डावपेच ज्यामध्ये ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनामा मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने कोर्टात जावे लागणे हा सर्व प्रकार अत्यंत क्लेषदायक व वेदनादायक होता. या सोबतच पक्षाचे चिन्ह गोठवणे, नाव गोठवणे हा प्रकारही या निवडणुकीसाठीच करण्यात आला, असेही ते म्हणाले.
“विलासरावांचं पडलेलं सरकार भुजबळांनी वाचवलं, आणि आज..” अजित पवार
पुढे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महाराष्ट्राची परंपरा ही यापेक्षा वेगळी आहे, ज्यामध्ये एखाद्या जागेसाठी काही दिवस शिल्लक असताना शक्यतो निवडणूक बिनविरोध होते. तसेच या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला असता, असा दावाही त्यांनी केला. या निर्णयातून अनावश्यक गोष्टी टळल्या आहेत. ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून आणण्याच्या निर्णयाचे जयंतराव पाटील यांनी मनापासून स्वागत केले.
“उद्धव ठाकरे अन् राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्यावं, मी आयोगाला पत्र पाठवणार”
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक साधारणतः दीड वर्षांच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपाचे श पटेल यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्या प्रसंगी मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून स्वतः भूमिका घेतली होती की, गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कोणी उमेदवार उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उमेदवार उभा करणार नाही. तसा निर्णयही घेतला. प्रामाणिकपणे असे वाटते स्व. रमेश लटके यांचे महानगरपालिका आणि विधिमंडळातील योगदान व निवडणूक निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल व महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून देण्यात यावे असे शरद पवार यांनी केले.
Read also
- “राजकरणातील विद्यापीठ पवार साहेब आता मैदानात उतरलेत, लक्षात ठेवा”; रूपाली पाटलांनी सुनावलं
- “फडणवीस साहेब अंहकार बरा नव्हे, नियती तो कधी ना कधी उतरवतेच”; राष्ट्रवादीचा टोला
- अंधेरी पोटनिवडणूकीतून भाजपची माघार..! ऋतुजा लटकेंचा मार्ग मोकळा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल!
- “महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं भुजबळांचं काम”; शरद पवारांकडून भुजबळांचा सन्मान