मुंबई : राज्यात मागील दीड वर्षात दोन राजकीय भुकंप झालेत. सुरूवातीला एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडली, त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड पुकारला. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि महायुती स्थापन झाली. यानंतर मंत्रीपदावरून शिवसेना तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमधील आमदारांची नावे चर्चेत आली. यावरून मोठा गोंधळ बघायला मिळाला म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार देखील रखडला. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक मोठा दावा केलाय.
हेही वाचा…राष्ट्रवादीतल्या सासऱ्यावर भाजपमधील सून भारी पडणार का? ; ‘या’ लोकसभा मतदारसंघात निवडणूक गाजणार
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिंदे सरकारमध्ये येणार होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. जंयत पाटील हे केवळ शरीराने तिकडे आहेत. परंतु मनाने अजित पवारांसोबतच आहेत. आज जरी ते निष्ठेच्या गप्पा मारत असले तरी त्यांनीच पुण्यातल्या बैठकीत सांगितलं होतं की, आपण शरद पवारांशी चर्चा करून महायुतीत जाऊ या. बैठकीला सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. त्यामुळे जयंत पाटील यांनी या निष्ठेच्या गप्पा थांबवाव्यात. असं म्हणत जयंत पाटील आमच्याकडे यायला फार वेळ लागणार नाही. असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय.
हेही वाचा..“पुर्वी मंबाजी, तुंबाजी होते, आताच्या काळात मिटकरी आहेत”, शरद पवार गटाने मिटकरींना डिवचलं
संजय शिरसाट यांच्या दाव्यावर जयंत पाटलांनी जोरदार पलटवार केलाय. माझं आणि संजय शिरसाट यांचं कधी बोलणं झालेलं नाही. त्यामुळे माझ्या मनात काय आहे हे त्यांना कसं कळणार? ते तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्यांनाच विचारलं पाहिजे. एखादी व्यक्ती काहीतरी बोलते, मग तुम्ही त्यावर दुसऱ्या नेत्याला जाऊन प्रतिक्रिया विचारता, हे कसं चालेल. ते वक्तव्य करण्यामागे संजय शिरसाट यांचा नेमका उद्देशकाय ते मला माहिती नाही. असंही जयंत पाटील यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“त्या” किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरलं होतं”, जरांगे पाटलांनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी
हेही वाचा..“दादांसोबत नाही म्हणून आता सुप्रिया सुळेंना बारामतीत तळ ठोकावा लागतोय”, रूपाली चाकणकरांनी सुळेंना डिवचलं
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त संगीतमय भव्य भजन स्पर्धा ; पुणेकरांना अनुभवायला मिळणार ‘याची देही याची डोळा’
हेही वाचा…हे तीन चेहरे डोक्यात साठवून ठेवा.! IIT BHU मधील सामूहिक ब’ला’त्का’र प्रकरण, तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य
हेही वाचा.रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवर भाजपचा डोळा ; भाजप ‘या’ कॅबिनेट मंत्र्याला मैदानात उतरवण्याच्या तयारीत