रायगड: महाड तालुक्यातील तळीये गावात होत्याचं नव्हतं झालं आहे. कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. २२ जुलैला दुपारी ४ वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास ३५ घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या ३५ घरांतील जवळपास ७०-८० माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ४० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
हे पण वाचा: महाराष्ट्रात पावसाचा कहर, पूरग्रस्त भागातील रुग्णांसाठी आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घरं उद्ध्वस्त झालीत, पण या घरातील माणसं गाढली गेली आहेत.
हे पण वाचा: राज्यात पावसाचे थैमान, आता पर्यंत १३६ बळी, ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट
तळये दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे.अनेक नातेवाईक डोळे लावून वाट बघताय आमच्या नातेवाईक कधी बघायला मिळतील. तळीये गावात रेस्क्यू ऑपरेशन जोरात सुरु आहे. स्थानिक प्रशासनासोबत इतर ठिकाणच्या सुद्धा रेस्क्यू टीम दाखल होत आहेत. ठाणे शहरातील एक रेस्क्यू ऑपरेशन टीम तळीये गावात पोहोचली.
हे पण वाचा: नौदलास मदत कार्य करण्याचे निर्देश माझ्या विनंतीवरुन; संभाजीराजे म्हणतात…
गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली ३५ घरे दबली गेली.
हे पण वाचा: महाराष्ट्रात पावसाचा कहर, पूरग्रस्त भागातील रुग्णांसाठी आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा ४० वर पोहोचला. तर ८० ते ८५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
Read Also :
- जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, “हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री”
- महाराष्ट्रात पावसाचा कहर, पूरग्रस्त भागातील रुग्णांसाठी आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
- राज्यात पावसाचे थैमान, आता पर्यंत १३६ बळी, ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट
- दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार – एकनाथ शिंदे
- महाराष्ट्रात पावसाचे थैमान, सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला