मुंबई : मागील काही दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद यांच्यात जोरदार शाब्दिक वार सुरू आहे. यामध्ये अनेक राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर भाष्यंही केलं आहे. तर या वादाता आता महिला आयोगाने देखील उडी घेतली असून त्यावरून आता ऊर्फीने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली. त्यावर आज चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.
“येत्या ८ ते १० दिवसात ठाकरे गटातील…”; उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा आणणारी बातमी
आमचा आक्षेप अंगप्रदर्शनावर आहे, या संदर्भात दोन तक्रारी आयोगाकडे आहेत. यात एका प्रकरणात वेगळा न्याय आणि दुसऱ्या प्रकरणात दुसरा न्याय. माझा आक्षेप संस्थेवर नाही. माझा आक्षेप हा संस्थेच्या अध्यक्षावर आहे. तिथे काय काम करतात याची माहिती मला आहे, आयोग म्हणजे तुम्ही एकट्या नाहीत. एका व्यक्तीला जाब विचारायचा आणि एका व्यक्तीला गोंजारायचं असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
“शिंदे सरकार सध्या व्हेंटिलेटर, हे काढलं की सरकारचं राम नाम सत्य है…!”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, काहीही झाले तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही. आमचा आक्षेप कपड्याच्या तुकड्यावर आहे. माझी लढाई सुरूच राहणार आहे. आमचा विरोध त्या महिलेला नाही, त्या महिलेचा सुरू असलेल्या नंगानाचला आहे. आम्ही आमची भूमिका मांडली होती. तुम्हाला यात कोणी आमंत्रण दिलेले नव्हते. तुमच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. या अगोदर त्या पदावर अनेकजण बसले होते. यात त्यांनी चांगला ठसा उमटवला आहे. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- चित्रा वाघ आता गप्प का? त्यांचे तर कपडे सुद्धा..; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “त्यामुळे काहींचं का आकाश पाताळ एक झालं”; अजित पवारांनी त्या वक्तव्यामुळे मागितली माफी
- “नारायण राणे यांचं केंद्रातील केंद्रीय मंत्रीपद लवकरच जाणार”, मोठ्या नेत्याचं भाकित
- अजित पवारांच्या दौऱ्यांत सतर्क रहा, पोलिसांना गृहविभागाच्या सूचना
- “ज्यांची भीती सत्ताधाऱ्यांना नसते त्यांना कुठेही लघूशंका करण्याची परवानगी मिळते”