मुंबई : मागील काही दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद यांच्यात जोरदार शाब्दिक वार सुरू आहे. यामध्ये अनेक राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर भाष्यंही केलं आहे. तर या वादाता आता महिला आयोगाने देखील उडी घेतली असून त्यावरून आता ऊर्फीने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.
“शिंदे सरकार सध्या व्हेंटिलेटर, हे काढलं की सरकारचं राम नाम सत्य है…!”
भाजपच्या तामिळनाडू राज्यातील नेत्या आणि अभिनेत्री गायत्री रघूराम यांनी भाजपला रामराम केला आहे. भाजप पार्टी महिलांसाठी सुरक्षित नाहीत, म्हणून मी पार्टी सोडत असल्याचं गायत्री यांनी सांगितलं आहे. त्याचाच स्क्रिनशॉट ऊर्फीने शेअर करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.
ऊर्फीने आपल्या इंस्ट्रग्रामवर ही बातमी शेअर केला आहे. त्यात ऊर्फीने लिहिले आहे की, आता चित्रा वाघ गप्प का आहेत. यांचे तर कपडे सुद्धा चांगलं आहेत. तुमच्यात पार्टीतील लोकांमुळे हे झाले आहे. जिथे आवाज उठवायला हवा तिथे आवाज नाही उठवणार. असं म्हणत ऊर्फीने डिवचलं.
Read also
- “त्यामुळे काहींचं का आकाश पाताळ एक झालं”; अजित पवारांनी त्या वक्तव्यामुळे मागितली माफी
- “नारायण राणे यांचं केंद्रातील केंद्रीय मंत्रीपद लवकरच जाणार”, मोठ्या नेत्याचं भाकित
- अजित पवारांच्या दौऱ्यांत सतर्क रहा, पोलिसांना गृहविभागाच्या सूचना
- “ज्यांची भीती सत्ताधाऱ्यांना नसते त्यांना कुठेही लघूशंका करण्याची परवानगी मिळते”
- “येत्या ८ ते १० दिवसात ठाकरे गटातील…”; उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा आणणारी बातमी