पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती ते सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दरम्यान १२ जानेवारी ते २३ जानेवारी मध्ये युवक सप्ताह खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच निमित्ताने १२ जानेवारी रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगराच्या वतीने भव्य अशी बाईक रॅली करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा संपूर्ण जग या महामारीशी लढत होतं, संपूर्ण जनता जेव्हा त्रासलेली होती, अशा परिस्थितीत स्वत:च्या जिवाचीही पर्वा न करता जे कोरोना योद्धे दिवसरात्र कार्यरत राहून देशाची सेवा करत होते, अशा सर्व कोरोना योद्धयांना समर्पित, ह्या बाईक रॅलीचे आयोजन अभाविप पुणे महानगराच्या वतीने करण्यात आले. सतत देशाच्या सेवेसाठी तत्पर असेल हा संदेश देत तसेच कार्यकर्त्यांना देशसेवेसाठी प्रेरणादायी उर्जा देण्यासाठी अभाविप ने आज रॅली फॉर द नेशनचे आयोजन केले.
विविध भागांतून युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या बाईक रॅलीत सहभाग करून बाईक रॅलीची अजूनच शोभा वाढवली. याचबरोबर, प्रभु श्रीरामचंद्र मंदिर निधी संकलनासाठी नागरिकांना जागरूकता करून देण्यासाठी देखील या रॅली मार्फत प्रयत्न करण्यात आला. या बाईक रॅलीचे शहरातील विविध मार्गांवर नागरिकांकडून उत्साहाने स्वागत करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, तसेच पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली पार पडली.यावेळी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे इतर कार्यकर्ते तसेच युवक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
Read Also :
- ‘मलिक यांच्यावर ‘ड्रग माफिया’ असणाऱ्या जावयाला वाचवायची वेळ आलीये’, भाजप आमदाराची टीका
- ‘घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवताय’, भातखळकरांचा नवाब मलिक यांना टोला
- … तर उद्धव ठाकरे आणि पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा- चंद्रकांत पाटील
- शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरुच राहणार, राहुल गांधींचा इशारा
- ‘टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका’, संदीप देशपाडेंचा आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा