मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठत असताना, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समिर खान यांना ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्याने नवाब मलिक सातत्याने नेते आणि पक्षांची भूमिका मांडत असतात. मात्र आता त्यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्याने भाजपकडून सडकून टीका केली जात आहे.
मलिक यांच्यावर ड्रग माफिया असणाऱ्या जावयाला वाचवायची वेळ आली आहे, अशा शब्दात भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार,व्याभिचार आणि स्वैराचारावर पांघरून घालणारे नवाब मलिक यांच्यावर आता ड्रग माफिया असणाऱ्या जावयाला वाचवायची वेळ आली .. #NCB
— Ram Satpute (@RamVSatpute) January 13, 2021
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार,व्याभिचार आणि स्वैराचारावर पांघरून घालणारे नवाब मलिक यांच्यावर आता ड्रग माफिया असणाऱ्या जावयाला वाचवायची वेळ आली, असे ट्विट करत सातपुते यांनी टीका केली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले होते. 10 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आले. मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत.
Read Also :
- ‘घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवताय’, भातखळकरांचा नवाब मलिक यांना टोला
- … तर उद्धव ठाकरे आणि पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा- चंद्रकांत पाटील
- शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरुच राहणार, राहुल गांधींचा इशारा
- ‘टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका’, संदीप देशपाडेंचा आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
- न्यायालयाची शेतकरी कायद्यांना स्थगिती, मात्र लढाई अजून संपलेली नाही – सतेज पाटील