मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत दोन गट पडले असून आता शिवसेनेच्या निवडणुक चिन्हांवरून जोरदार आक्रमक सुरू आहे. यातच आता आदित्य ठाकरे यांच्या विविध ठिकाणी जोरदार जाहीर सभा होत आहेत. या जाहीर सभांमधून आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधत आहेत. यावर आता शिंदे गटातील प्रवक्ते दिपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा निम्म्यापेक्षा वयाचे आहेत. तरीही ते आले की मीही उठून उभा राहतो. कारण, तो सन्मान बाळासाहेब ठाकरे यांना असतो. राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा हे आदित्य ठाकरे यांचं आव्हान हे पोकळ आहे. कारण, ते कुठला तरी इतिहास सांगत आहे. मी नारायण राणेंचा अलिकडचा इतिहास सांगतो. कोणीही त्यांच्या धमक्यांना घाबरत नाहीत. २० ते २५ टक्के ही पक्षाची मतं असतील, ती राष्ट्रवादीचीही असतील, मग शिवसेनेनं उभा केलेला प्रत्येक माणूस का निवडून आला नाही, असा सवाल देखील दिपक केसरकर यांनी केला आहे.
“शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा उद्धव ठाकरेंनी का सुरक्षा दिली नाही”
एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर चला, हजार लोकं असतात. तिथे वाढदिवसाएवढी गर्दी रोज असते. तुमच्याकडची ५० आमदार लोकं अशीच निघून जातात का, आमचा लढा स्वाभिमानासाठी असून शिवसेना वाचावी हाच आमचा हेतू होता. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीविरूद्ध आमचा लढा सुरूच आहे, मग आमच्याविरूद्ध का बोलता, असे म्हणत दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा होणार; सुहास कांदे, आदित्य ठाकरे येणार आमनसामने
आदित्य ठाकरेंना खऱ्या शिवसैनिकांची ओळख कशी असले, ते भेटेल असतील तर त्यांना खरा आणि खोटा शिवसैनिक माहिती असेल. उद्या राष्ट्रवादीचा एखादा माणूस आला तीर ते त्याला शिवसैनिकच म्हणणार, असे म्हणत दिपक केसरकरांनी नाशिकच्या गर्दिचा उल्लेख केला. तसेच आदित्य ठाकरे असून लहान आहे. त्यांनी कोणाबद्दल कसं बोलावं ते उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकावं असा सल्ला देखील दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.
Read also
- “राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
- “राजकारण वेगळं अन् कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर..;”शिंदेंच्या सुरक्षाबाबत मनसेने ठणकावलं
- “शिवसेनेच्या आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे”; दिपाली सय्यदचा सल्ला
- “जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव..;” अमृता फडणवीसांच्या अनोख्या शुभेच्या
- तर मग केंद्रात जाऊन अमित शहांचे पाय का चाटणार का? कांदेंवर दानवेंचा हल्लाबोल