मुंबई : मागील काही महिन्यापासून शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी कुणीही सोडत नाहीत. यातच आता 40 गद्दार आमदार, 13 खासदार आणि यांच्यासोबत महापालिका निवडणुका घेऊन दाखवावं. असं आवाहन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.
मुंबई फिल्मसिटी युपीला जाणार असल्याच्या आरोपावर योगीचं उत्तर, म्हणाले, मुंबई ही..
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित आज सिनेट ची बैठक पार पडली. त्यानंतर ते बोलत होते. नव्या वर्षात चांगल्या कामाची सुरूवात केली आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या मतदार संघात शैक्षणिक उपक्रम सुरू करत आहोत. नवीन वर्षाची सुरूवात चांगली झाली आहे. पण या गद्दारांनी आता या वर्षात निवडणुका घेऊन दाखवण्याची हिमंत दाखवावी, असंही त्यांनी म्हटलं.
“‘टिल्लू’ च्या वर्मावर घाव बसलाय”; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबईकरांचा पैसा लुटायचा हा जो प्रयत्न सुरू आहे. तो कायदेशीर रोखण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याच्या विकासासाठी बाहेर जात नाहीत. इतर राज्याचे मुख्यमंत्री पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आपले मुख्यमंत्री मात्र, दिल्लीला जाऊन बसतात. अशी टिका देखील आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून केली.
Read also
- नितेश राणेंवर रूपाली पाटील भडकल्या, म्हणाल्या, “टिल्या बेडकांनी धरणात..”
- योगींच्या जाहिराती महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना देण्यामागचा भाजपचा छुपा अजेंडा काय?
- “राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी 1 हजार कोटी खर्च”, प्रियंका गांधी
- जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध, फडणवीसांना टॅग
- “कधीच कुणावर वैयक्तीक कंबरेखाली वार करत केला नाही, जर मला..” जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ