पुणे : पुणे मेट्रोच्या ट्रायल रनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरुन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यातच ” काम एक करतं अन् हार दुसरेच घालून जातात..”, असा सणसणीत टोला अमृता फडणवीस यांनी पुणे दौऱ्यावर असताना अजित पवारांवर लगावला होता. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे पुणे मेट्रोवरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं बोललं जात आहे. श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे, मिस्टर आणि मिसेस फडणवीसांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे.
२०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान
देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवाजीनगर परिसरातील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी सिव्हिल कोर्ट स्टेशन हे मल्टॉमॉडेल स्टेशनचं एक चांगलं उदाहरण असल्याचं फडणवीस म्हणाले. सगळ्या प्रकारचं काम इथं पाहायला मिळत आहे. अतिशय वेगानं महामेट्रोनं काम केलं आहे. मी महामेट्रोचं अभिनंदन करतो. २०१६ ला मोदी सरकार आणि राज्य सरकारने या कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर वेगानं हे काम होत आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना इथं पाहायला मिळेल. कोरोनामुळे कदाचित थोडा उशीर होईल, अशी शक्यताही फडणवीसांनी व्यक्त केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कंड्या पेटवू नका; बातम्या कमी पडल्या तर मला मागा – देवेंद्र फडणवीस
श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते ट्रायल रनचं उद्घाटन झालं. पण काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होईल. त्याला कुणी विरोध करणार नाही, असा दावाही फडणवीसांनी केला आहे. दरम्यान, मिसेस फडणवीस अर्थात अमृता फडणवीस काल पुणे दौऱ्यावर होत्या. त्यावेळी अमृता फडणवीसांनी या वादात उडी घेतली असून ” काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात” अशा शब्दात पुणे मेट्रोच्या ‘ट्रायल रन’ उद्घाटनावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
Read Also :
- “चावी आपल्या हातात आहे अंदाज घेऊन फिरवू कशी फिरावायची” मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
- … तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना ३०% जागा देणार, काँग्रेसची मोठी घोषणा
- “दगडातूनही तेल काढू शकतात, भलताच ब्रिलियंट माणूस”, राज्यपालांकडून गडकरींचं तोंडभरून कौतुक
- ९ मिनिटांच्या क्लिपमध्ये अखेर दडलंय तरी काय? भाजप मनसे युतीच्या प्रवासातील दुसरा एपिसोड