पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे-भाजप युती होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यामध्ये मोठं विधान केलं आहे. येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील-राज यांची भेट निष्फळ ठरलीय का? की भाजप इंजिन घेवून एकच जोर लावणार आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणाकडे होता? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजप प्रदेश अध्यक्ष बदलणार ? चंद्रकांत दादा चार दिवस दिल्लीत
देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत. त्यांनी पुण्यातील मेट्रो कामाची पाहणी केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. मनसे आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर २०२४मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल एवढं ध्यानात ठेवा, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
यावेळी फडणवीस यांनी दिल्लीत जाणार असल्याचंही सांगितलं. दिल्लीत भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील दिल्लीत गेले आहेत. तर पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजप नेते सोमवारी दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या या दिल्लीवारीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी त्यांना तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याचं सांगितलं गेलं. त्याचं त्यांनी स्वागत केलं. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनीही राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे. परंपरेने नेतृत्व येत असेल तर त्या नेतृत्वाकडे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्याही येतील, असं ते म्हणाले.
Read Also :
- भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कंड्या पेटवू नका; बातम्या कमी पडल्या तर मला मागा – देवेंद्र फडणवीस
- … तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना ३०% जागा देणार, काँग्रेसची मोठी घोषणा
- “दगडातूनही तेल काढू शकतात, भलताच ब्रिलियंट माणूस”, राज्यपालांकडून गडकरींचं तोंडभरून कौतुक
- महापालिका रणधुमाळी : आदित्य ठाकरेंकडे महापालिकेची जबाबदारी तर, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार
- संजय काका पाटीलांसारखा घातकी मित्र आयुष्यात नको, बळजबरीने निवडणुकीला उभे केले आणि मग पाडले