मुंबई : काल एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर सगळ्यांचे लक्ष असताना दुसरीकडे निलंबित भाजप आमदार आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत गुप्त भेट घेतली. दरम्यान, राज यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील ४ दिवसांच्या नियोजित दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. मात्र, तातडीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला गेल्याने भाजपत काही तरी शिजत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
भाजपच्या ३ बड्या नेत्यांची दिल्लीवारी, राज्याच्या नजरा लागल्या राजधानीकडे; राजकीय वर्तुळात चर्चा
या पार्श्वभूमीवर, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत स्वतंत्र बैठका केल्याची माहिती मिळाली असून, राज्य भाजपचे ३ दिग्गज नेते एकाच वेळी दिल्लीत असल्याने, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगायला लागली आहे. कारण, पाटील यांच्या जागेवर शेलार यांच्या नियुक्तीसाठी भाजपचा एक गट लॉबिंग करत आहे आणि हाच वाद दिल्ली दरबारी पोहोचला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे, आता भाजप प्रदेशाध्यक्ष पदावरुन आता भाजपत जोरदार लॉबिंग सुरु झाल्याचं दिसत असून, दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष पदावरून गच्छंती होऊ नये, यासाठी पाटील देखील आपलं राजकीय वजन वापरत आहेत. कारण शहा-पाटील संबंध लक्षात घेतले तर, या संबंधाचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न पाटील नक्कीच करतील असा कयास सांगितला जात आहे. दरम्यान, येत्या सोमवारी पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार सुद्धा दिल्लीत येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
दुसरीकडे दिल्लीत दाखल झाल्यावर याबाबत प्रसाधन विचारला असता त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, “तशी काही शक्यता नाही. या भेटीत राजकीय चर्चा नाही. ते कार्यकर्त्यांचे प्रश्न घेऊन येतात, अधून मधून या भेटी होत असतात. यावेळी त्यांना मनसे-भाजप युती होऊन राज्यात ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार? असे विचारले असता, “शुभेच्छया असू द्या!” असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या दिल्ली भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Read Also :
- संजय काका पाटीलांसारखा घातकी मित्र आयुष्यात नको, बळजबरीने निवडणुकीला उभे केले आणि मग पाडले
- मनसेच्या गोटात हालचालींना वेग; नाशिक -पुणेनंतर राज ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर
- पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या’ महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपेना पत्र
- मोठी बातमी: देशात ओबीसींना वगळून निवडणुका होणे अशक्य – विजय वडेट्टीवार
- साहेब तुम्ही, पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी, राष्ट्रवादीचा मोदींना टोला