मुंबई: मुंबईत सेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन लढावं आणि ती जिंकून दाखवावी”, असं आव्हान काल चंद्रकांत पाटील यांनी केल होत. चंद्रकांतदादांच्या चॅलेंजला आज संजय राऊत यांनी जशास तसं प्रत्युत्तर देताना दादांच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं, तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?, असं म्हणत त्यांनी दादांवर शाब्दिक टीका केली.
हे पण वाचा: भाजपच्या ३ बड्या नेत्यांची दिल्लीवारी, राज्याच्या नजरा लागल्या राजधानीकडे; राजकीय वर्तुळात चर्चा
“मी काय कराव हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पहावं… माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे”, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांतदादांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पण अशाही परिस्थितीत माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली तिकडे मी असणारच, आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडणार”, असं संजय राऊत म्हणाले.
हे पण वाचा: पुण्यातील कोरोना निर्बंधांवरून राज्य सरकार आणि पुणे महापौर पुन्हा एकदा आमनेसामने
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची, सकाळी ११:३० वा. ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत सव्वा तास खलबतं झाली. त्यामुळे, पूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती; की या बड्या नेत्यांत कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली?
हे पण वाचा: “भेटीवर बंधन नाही, पण राजकारणात जर-तरला महत्त्व नसते”, पाटील-ठाकरे भेटीवर फडणवीसांचे विधान
चंद्रकांत पाटील काय म्हणाले
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील सांगितला. यावेळी त्यांनी, राज ठाकरेंच्या अंगणातून थेट शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुंबईत सेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन लढावं आणि ती जिंकून दाखवावी”, असं आव्हान दिलं आहे.
Read Also :
- साहेब तुम्ही, पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी, राष्ट्रवादीचा मोदींना टोला
- राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं नागपुरात अधिवेशन, आज ठरणार ओबीसींच्या पुढील लढ्याची दिशा
- मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, सोनिया गांधी, राहुल गांधी २८ डिसेंबरला शिवाजी पार्कवर
- ‘आधी अधिकार नाही म्हणून ओरडायचे, आता अधिकार दिले तर काय फायदा म्हणतात!’, मेटेंची चव्हाणांवर टीका
- शरद पवार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट, महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर चर्चा