नागपूर: नागपूर येथे आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ६ वे अधिवेशन ऑनलाइन आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी दिवंगत पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांनी मंडल आयोग लागू केलेला होता. हा दिवस आठवणीत रहावा, तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा स्थापना दिवस म्हणजेच ७ ऑगस्ट ओबीसी दिवस ‘मंडल दिवस’ म्हणूनही साजरा करण्यात येत आहे.
हे पण वाचा: मुंबईतील लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई
या अधिवेशनाचे उद्घाटन ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख पाहुणे जस्टिस व्ही. ईश्वरैय्या, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. हरी ईपन्नापल्ली, माजी आमदार डॉ. नारायण मुंडे, डॉ. अशोक जिवतोडे, दिलीप मंडल, ॲड.एन.टी. राठोड, जी. करुणानिधी, सचिन राजुरकर, डॉ. खुशाल बोपचे, हंसराज जांगिड, जाजुला गौड, जसपालसिंग खिवा, सुभाष घाटे, मधू नाईक, पोथनकर लक्ष्मीनारायण, मंजीत राणा, शाम लेडे, प्रकाश भंगरथ, चेतन शिंदे, रोशन कुंभलकर, सुषमा भड,ॲड.रेखा बाराहाते, श्रीमती. कल्पना मानकर आदी अधिवेशनात सहभागी असणार आहे.
हे पण वाचा: मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”
राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्थापना दिनानिमित्त महासंघांचं सहावं अधिवेशन आज नागपुरात ऑनलाईन पद्धतीने पार पडतंय. या अधिवेशनात ओबीसींच्या पुढील लढ्याची दिशा ठरवण्याबाबत मंथन होणार आहे. मंत्री विजय वडेट्टीवार ऑनलाईन पद्धतीने या अधिवेशाला हजेरी लावणार आहे. या अधिवेशात पुढील ओबीसी लढ्याची दिशा यावर वडेट्टीवार बोलतील.
Read Also :
- मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, सोनिया गांधी, राहुल गांधी २८ डिसेंबरला शिवाजी पार्कवर
- ‘आधी अधिकार नाही म्हणून ओरडायचे, आता अधिकार दिले तर काय फायदा म्हणतात!’, मेटेंची चव्हाणांवर टीका
- शरद पवार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट, महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर चर्चा
- कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- ‘नॉट रिचेबल’ देशमुखांच्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर ईडीची छापेमारी