मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. बेंगळुरुतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील पाणीवाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
हे पण वाचा: “भेटीवर बंधन नाही, पण राजकारणात जर-तरला महत्त्व नसते”, पाटील-ठाकरे भेटीवर फडणवीसांचे विधान
महाराष्ट्रात खासकरून पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होत आहे. सांगलीत कृष्णा नदी आणि कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पुरामुळे नागरिकांना मोठा फटका बसतोय. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची काल बेंगळुरूत भेट घेतली, एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा: “नावं बदलायची सोडून भाजप देशात विकासाठी काही करणार का?” काँग्रेसने घेतला आक्रमक पवित्रा
शरद पवार आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक पाणीवाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यासोबतच पूरस्थितीदरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये योग्य समन्वय राखण्यावरही चर्चा केली गेली. या मुद्द्यावर लवकरच एक सविस्तर बैठक घेण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला. दोन्ही राज्यांमधील पाण्यासंबंधीचे मुद्दे आणि नदीच्या पाण्याच्या वाटपावर बैठक घेऊन चर्चा करण्याचं निश्चित करण्यात आलं. यासंबंधीची पुढील बैठक दिल्लीत घेण्याचा निर्णयही दोन्ही नेत्यांनी घेतला.
हे पण वाचा: भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटींनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
शरद पवार यांनीही ट्वीट करून या भेटीची माहिती दिली आहे. आपण बेंगळुरूत असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा आपल्याला फोन आला. त्यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या पदाचा आदर राखत आपण गेले आणि त्यांची सदीच्छा भेट घेतली. त्यांनी दिलेल्या पाहुणचाराबद्दल खूप आभारी आहे. दोन्ही राज्यांमध्ये सोबत काम करती आणि सहकार्य अशाच प्रकारे कायम राहील, अशी आशा शरद पवारांनी ट्वीटमधून व्यक्त केली.
Read Also :
- कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- ‘नॉट रिचेबल’ देशमुखांच्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर ईडीची छापेमारी
- मुंबई लोकलबद्दल पुढच्या दोन दिवसात निर्णय होणार; आदित्य ठाकरेंचे महत्वपुर्ण विधान
- राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
- “अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या”, नामकरणाच्या वादावरून काँग्रेसची आक्रमक मागणी