सांगली : सांगलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्यांनतर, सांगली भाजपने चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येत असून, आता सांगली भाजपमधील कुरबुरी देखील बाहेर येऊ लागल्या आहेत. सांगलीचे भाजपचे बडे नेते मानले जाणारे संजय काका पाटील यांच्यावर भाजपचे माजी आमदार विलास जगताप यांनी, “मला निवडणुकीला बळजबरीने उभे केले आणि मला पाडले”, असा गंभीर आरोप केला आहे.
“संकटात मदत करतो तो खरा मित्र. पण संजय काका पाटीलांसारखा घातकी मित्र आयुष्यात कोणाच्या वाट्याला येऊ नये. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीला त्यांनी मला बळजबरीने उभे केले आणि मला पाडायला सुद्धा त्यांनीच षडयंत्र केलं. मी झकमारी केली आणि त्यांचं ऐकलं. ते फसवणारे नेते आहेत”, अशी तोफ त्यांनी शनिवारी जत तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना डागली.
मनसेच्या गोटात हालचालींना वेग; नाशिक -पुणेनंतर राज ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर
तसेच, “अशी अनेक लोकं आपल्याला आयुष्यात भेटतात, यांच्यापासून सावधान रहा! माणसाच्या मागे किती मतं आहेत, हे महत्त्वाचं नसतं. त्या माणसाचे विचार कसे आहेत, हे जास्त महत्त्वाचं असतं. हार-जीत कोणाची होत नाही, मी सुद्धा २ वेळा हरलो, एकदा आमदार झालो. पण मला काम करायची संधी मिळाली. पण या सगळ्यात संजयकाका पाटील यांच्यासारख्या घातकी लोकांपासून सावध कसे राहायचे हे मी शिकलो, ते गरजेचे आहे”, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
कोण आहेत संजय काका पाटील?
- काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीमधून विधानपरिषदेचे आमदार
- काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली.
- दिवंगत आरआर आबांचे पक्षांअंतर्गत शत्रू. २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपत प्रवेश
- २०१४ ला भाजपतुन लोकसभेवर (सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार)
- २०१४-२०२१९ च्या निवडणुकीत भाजपकडून निवडून आले आहेत.
- बेधडक आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख
Read Also :
- पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या’ महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपेना पत्र
- मोठी बातमी: देशात ओबीसींना वगळून निवडणुका होणे अशक्य – विजय वडेट्टीवार
- ‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
- साहेब तुम्ही, पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी, राष्ट्रवादीचा मोदींना टोला
- राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं नागपुरात अधिवेशन, आज ठरणार ओबीसींच्या पुढील लढ्याची दिशा