पुणे : नाशिक आणि पुण्यातील मोर्चेबांधणीनंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळवणार आहेत. त्यादृष्टीने मनसेच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे लवकरच मराठवाड्यात सभा घेणार आहेत. या सभेसाठी तयारील लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मनसेच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते.
भाजपच्या ३ बड्या नेत्यांची दिल्लीवारी, राज्याच्या नजरा लागल्या राजधानीकडे; राजकीय वर्तुळात चर्चा
ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे २७ जुलैला पुण्यात दाखल झाले होते. राज ठाकरे २ ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्याआधीच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९,२० आणि २१ जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे ३० जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली होती. त्यानंतर आता राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर गेले आहेत.
“भेटीवर बंधन नाही, पण राजकारणात जर-तरला महत्त्व नसते”, पाटील-ठाकरे भेटीवर फडणवीसांचे विधान
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा केला होता.
पुणे मेट्रो : भाजप-राष्ट्रवादीची श्रेयवादाची लढाई सुरुच, मेट्रोच्या कामाची उद्या फडणवीस करणार पाहणी
दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.
Read Also :
- मोठी बातमी: देशात ओबीसींना वगळून निवडणुका होणे अशक्य – विजय वडेट्टीवार
- ‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
- साहेब तुम्ही, पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी, राष्ट्रवादीचा मोदींना टोला
- राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं नागपुरात अधिवेशन, आज ठरणार ओबीसींच्या पुढील लढ्याची दिशा
- मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, सोनिया गांधी, राहुल गांधी २८ डिसेंबरला शिवाजी पार्कवर