परभणी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक करताना सर्वपक्षीय नेते थकत नाहीत. काही दिवसांपूर्वी नागपूर मेट्रोच्या एका कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी, “नितीन गडकरीसारखं काम कुणीही करत नाही. गडकरीजी तुमच्या तंत्रज्ञानाची राज्यातल्या वाहून गेलेल्या पुलांना आणि खचलेल्या रस्त्यांना गरज आहे”, असं म्हणत गडकरींची स्तुती केली होती.
९ मिनिटांच्या क्लिपमध्ये अखेर दडलंय तरी काय? भाजप मनसे युतीच्या प्रवासातील दुसरा एपिसोड
दरम्यान, ३ दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, आज परभणीत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत भवनातील, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. यांनतर त्यांनी बांबू लागवड प्लॉटला भेट दिली. तसेच, शेतीविषयक अवजारांची पाहणी केली. यावेळी त्यांनी देखील गडकरी यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
महापालिका रणधुमाळी : आदित्य ठाकरेंकडे महापालिकेची जबाबदारी तर, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार
“नितीन गडकरी हा एक ब्रिलियंट माणूस आहे. दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतो. बांबू लागवडीला गडकरी यांनी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या”, असा सल्ला विद्यापीठाच्या कुलगुरुंना देत गडकरींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तसेच, “पंतप्रधान म्हणतात ‘सब का साथ सब का विकास और सबका विश्वास’, याप्रमाणेच सगळ्यांनी एकत्रित राहा”, असाही मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
भाजप प्रदेश अध्यक्ष बदलणार ? चंद्रकांत दादा चार दिवस दिल्लीत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काल हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी, “संविधानाने मला दिलेल्या अधिकारांचा वापर करून मी जिल्ह्यात आलो आहे”, असं सांगितलं. त्यांनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेत जिल्ह्यातील सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था यासंदर्भातली माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. दरम्यान, काल राज्यपालांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा नरसी नामदेवकडे जाताना किरकोळ अपघात झाला. मात्र अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही.
Read Also :
- संजय काका पाटीलांसारखा घातकी मित्र आयुष्यात नको, बळजबरीने निवडणुकीला उभे केले आणि मग पाडले
- कोल्हापुरात स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देताय? राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना टोला
- मनसेच्या गोटात हालचालींना वेग; नाशिक -पुणेनंतर राज ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर
- पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या’ महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपेना पत्र
- मोठी बातमी: देशात ओबीसींना वगळून निवडणुका होणे अशक्य – विजय वडेट्टीवार