मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत सव्वा तास खलबतं झाली. त्यामध्ये राज ठाकरेंनी ९ मिनिटांची परप्रांतियांबद्दलच्या भूमिकेची व्हिडीओ क्लिप चंद्रकांत पाटलांना दाखवल्याचा त्यांनी माध्यमांसमोर खुलासा केला. त्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी समर्थनही दर्शविले. परंतू, मुळात ती ९ मिनिटांची क्लिपनसून ५० मिनिटांची क्लिप असल्याचे खुद्द मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या फेसबूक वॉलवरून जाहीर केले. मग राज ठाकरेंनी ५० मिनिटांची क्लिपकापून नऊच मिनिटांची का दाखवली?, असा प्रश्न निर्माण होतो. परंतू, यावरून एक गोष्ट सरळ स्पष्ट होते की आगामी महापालिका निवडणूक मनसे – भाजप एकत्र लढणार.
चंद्रकांत पाटील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार, मनसे-भाजपच्या राजकारणाला मिळणार दिशा?
भेटीनंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना पत्रकारांच्या प्रश्न अगोदरच “बैठकीत युती बाबत कुठलीही चर्चा झाली नाही, परंतू राजकीय चर्चा झाली असं म्हणता येईल, असे स्पष्टीकरण दिले. म्हणजे चंद्रकांत पाटलांना माहिती होत आत काय घडलयं याचा खुलासा पत्रकार मागणार, त्यामुळे प्रश्ना अगोदरच पाटलांनी उत्तराला सुरूवात केली. याचा अर्थ सरळ दिसून येते की आगामी महापालिका निवडणूकीत मनसे- भाजप युती होणार आहे. कारण, चंद्रकांत पाटील बाहेर किती वैचारिक चर्चा झाली हे सांगत होते पण मध्ये किती वैचारिक झाली असेल हे सगळ्यांना माहितीये. त्यामुळे, भेटीचा आणि माध्यमांसमोरील स्पष्टीकरण हे स्क्रिप्टेड असल्याचे दिसून येते.
भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटींनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
राज ठाकरेंनी काही महिन्यांपुर्वी परप्रतिंयांची एक सभा घेतली. त्यामध्ये बोलतांना परप्रांतियांना त्यांच्याच राज्यात रोजगार मिळाला पाहिजे. कारण, त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील तरूणांना रोजगार मिळत नाही, अशी भूमिका मांडली. या भाषणाचा ५० मिनिटांचा व्हिडीओ आहे. त्यामध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल देखिल बेताल वक्तव्य केले आहे. परंतू, चंद्रकांत पाटलांच्या भेटीत त्यांनी केवळ ९ मिनिटांची क्लिप दाखवली. मुळात प्रश्न निर्माण होतो की ती केवळ ९ मिनिटांचीच का दाखवली. तर भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे की, राज ठाकरेंनी त्यांची भूमिका बदलावी, त्यानंतर आम्ही युतीचा विचार करू. याचा अर्थ सरळ आहे की चंद्रकांत पाटलांना भेटून राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचाच चंद्रकांत पाटील म्हणतात की, राजकीय चर्चा झाली. म्हणजे यातून सरळ हे दिसून येत आहे की मनसे – भाजप युती होणार? कारण चंद्रकांत पाटील राज ठाकरेंच्या भेटीला केवळ गळा भेट घ्यायला गेले होते का? राज ठाकरेंनी फक्त ९ मिनिटांचीच क्लिप का दाखवली?, त्या क्लिपला पाटलांनी समर्थन का दर्शवले?, तर यातून हेच स्पष्ट होते की आगामी महापालिका निवडणूकीत युती अटळ असल्याचे हा दुसरा एपिसोड सुरू झाला आहे.
भाजपला मनसेची गरज
२०१९ ला राजकीय मतभेदापायी सेना-भाजपचात फुट पडली. त्यांनंतर भाजप एकटी पडली. त्यातच आता आगामी महापालिका निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. मात्र, त्यावेळी भाजपला एका जोडीदाराची गजर असल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे, २०१९ ला एक ठाकरे सोडला तर २०२२ ला दुसरा ठाकरे भाजप धरू पाहतोय. कारण राज्यातील अनेक महापालिका भाजपच्या ताब्यात असल्यातरी भाजपचा मुख्य अजेंडा मुंबई महापालिका आहे. आता कसं झालंय उत्तर प्रदेश निवडणुका आल्या आहेत. त्यात नुकसान होऊ नये म्हणून राज ठाकरेंची भूमिका ही विरोधातील नाहीये हे सांगितले जाणार. आणि येन मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी भाजप मनसे युती जाहीर होईल, हाच शेवटचा एपिसोड असेल.
Read Also :
- महापालिका रणधुमाळी : आदित्य ठाकरेंकडे महापालिकेची जबाबदारी तर, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार
- संजय काका पाटीलांसारखा घातकी मित्र आयुष्यात नको, बळजबरीने निवडणुकीला उभे केले आणि मग पाडले
- मनसेच्या गोटात हालचालींना वेग; नाशिक -पुणेनंतर राज ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर
- पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या’ महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपेना पत्र
- मोठी बातमी: देशात ओबीसींना वगळून निवडणुका होणे अशक्य – विजय वडेट्टीवार