पुणे : ससून रूग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर कसब्यातील काॅंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरांनी थेट ससून रूग्णालय गाठून ससून रूग्णालय प्रशासनाला धारेवर धरले आहे. तसेच दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा…२०२४ च्या लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, बैठकीत ‘या’ नेत्यांवर केला शिक्कामोर्तब
ससून रूग्णालयातून कैद्याने पलायन केल्याप्रकरणी काॅंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर आक्रमक झाली आहे. दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धंगेकरांनी केली, त्यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतापलेल्या धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी सुचवलं ‘या’ नेत्याचं नाव
दरम्यान, कैदी पलायन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालयात भेट दिली. त्यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाबाबत विचारणा केली. अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील याने रुग्णालयातून पलायन केल्याप्रकरणी प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी विचारली. पाटील याला कुठले आजार होते आणि त्याच्यावर नऊ महिने कोणते उपचार केले, याबद्दल चौकशी धंगेकर यांनी केली. तसेच, दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल न करण्याचे कारणही त्यांनी विचारले.
READ ALSO :
हेही वाचा…“तेव्हा पंकजाताई अनेकवेळा पवारसाहेबांना भेटायला यायची”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
हेही वाचा…चर्चेत असलेले गोगावले मंत्रीपद सोडून शिंदेंना साथ का देताहेत ? गोगावलेंनीच सांगितलं कारण
हेही वाचा…महाराष्ट्राच्या तळागाळातून ठाकरेंना पाठिंबा, मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना लगावला टोला, म्हणाल्या, अहो चित्राताई, अगोदर..,
हेही वाचा…शिवाजी पार्क मैदानावरून दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने माघार का घेतली ? शिंदे गटातील आमदाराने दिले स्पष्टीकरण