पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना अखेर वंचितकडून उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. त्यांचा सामना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि कॉंग्रेसचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासोबत असणार आहे. त्याआधीच आता वसंत मोरे यांनी विकासाचा कात्रज पॅटर्न असा प्रचार करत त्यांनी एकप्रकारे आता धंगेकरांना आव्हान दिलं आहे.
हेही वाचा…“वडेट्टीवार भाजपमध्ये जातील म्हणणाऱ्या आत्रामांना वडेट्टीवारांनी चांगलचं फटकारलं,” म्हणाले…
लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी वसंत मोरे यांनी कॉंग्रेससह राष्ट्रवादीशी चर्चा केली. मात्र त्यांना याठिकाणाहून उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या तिकीटावर उमेदवारी दिली आहे. यातच आता वसंत मोरे यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. यातच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर टाकले आहेत. त्यात एल अलामीन मेमोरिअयल फाऊंटन सिडनी आणि अहिल्यादेवी होळकर उद्यान कात्रजमधील केलेल्या विकासकामांचा फोटो टाकला आहे. त्यात त्यांनी विकासाचा कात्रज पॅटर्न म्हणत होय हे मी केलंय कात्रजमध्ये असे म्हटलं आहे. त्याचबरोबर आता संधी हवीय पुण्यासाठी असाही उल्लेख केलाय.
हेही वाचा…“अल्पसंख्याक समाज सुज्ञ, तो महायुतीच्या पाठीमागे 100 टक्के उभा राहिलं”, तटकरेंचा विश्वास
वंसत मोरे यांच्या आधी रवींद्र धंगेकर यांनी देखील उमेदवारीच्या आधी असाच प्रचार केला. पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न म्हणत धंगेकरांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्याआधी कसबा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर कसबा पॅटर्नाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर धंगेकर पॅटर्न असा प्रचार केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला आता वसंत मोरे यांनी देखील कागज पॅटर्न असा प्रचार सुरू केलाय. त्यामुळे धंगेकर आणि मोरे एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत का ? असा सवाल यानिमित्ताने आता उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…देशहितासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून मोदींना पाठिंबा द्या”, अर्चना पाटलांचं मतदारांना आवाहन
हेही वाचा…“टकमक टोकावरून यावेळी अनंत गीतेंचा कडेलोट करणार”, भरत गोगावलेंनी अनंत गितेंना दिला कडक इशारा
हेही वाचा…“धुळ्यात शोभा बच्छावांना उमेदवारी जाहीर, कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा थेट राजीनामा”
हेही वाचा…“शिवतारेंना माघार घेतांना कोणतं आश्वासन दिलं होतं,” ? शिवतारे अन् अजित पवारांनी केलं स्पष्ट
हेही वाचा…“गेल्या पाच वर्षात मतदारसंघात खासदार फिरकलाच नाही”,आढळरावांचा कोल्हेंना खोचक टोला