मुंबई : गेल्या काही दिवसापासून परतीच्या पावसाने अनेकांची दैना उडवली आहे. जोरदार पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यात मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले. यातच आता राज्यात विरोधी पक्षासह राज्यातील घटक पक्षातील नेत्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र सरकारने अद्यापही ओला दुष्काळ केला नाही. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
“ठाकरे सरकारचा ‘तो’ निर्णय ही शिंदे सरकारने बदलला”;
राज्यात मराठवाड्यात सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचं झालेल्या नुकसानीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र असं असूनही अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर केला नाही. यावरून दिवाळीच्या तोंडावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी थातूरमातूर दौरे करून शेतकऱ्यांची एकप्रकारे टिंगल केली आहे. अशी टिका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
“मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार
पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या ठिकाणी परतीच्या पावसाने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी सद्या दुष्काळाची परिस्थिती नाही असे म्हणणे अत्यंत घृणास्पद आहे. ओला दुष्काळ जाहीर करा. असं देखील अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचं पंचनामा करून त्यांना 15 दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अशी माहिती सत्तार यांनी दिली आहे.
“मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार
दरम्यान, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी कृषीमंत्र्यांनी बांधावर जाऊन केली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनामा करीत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्याची सूचना सत्तार यांनी दिली आहे.
Read also
- “स्वत; उद्धव ठाकरे मैदानात आले की भाजपचा पालापोचाळा होईल”
- “राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं”; शिंदे, फडणवीस अन् ठाकरे भेटीवर भाजपची प्रतिक्रिया
- नाशिक- पुणे रेल्वे प्रकल्पाला ब्रेक..! अमोल कोल्हे संतापले, म्हणाले, “इतके दिवस मग काय…;”
- “शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय केली”
- चंद्रकांत पाटलांची भूमिका म्हणजे भाजपाला घरचा आहेर : चेतन बेंद्रे