मुंबई : शासन कार्यानियमावलीच्या दुसऱ्या अनुसुचित निर्दिष्ट केलेली सर्व प्रकरणे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. असा आदेश मुख्य सचिवांनी काढल्याने अजित पवार यांच्याकडून फाईल थेट मुख्यमंत्र्याकडे न जाता फडणवीस यांच्या माध्यमातून जाणार आहे. यावरून अजित पवारांचे पंखे छाटले असल्याची मंत्रालयात कुजबूज सुरूय. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…शेतकरी नेत्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश, शरद पवारांची ताकद वाढली
दादांच्या दादागिरीला भाईंचा लगाम..! असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार मंत्रिमंडळात येऊन दोन महिने पण झाले नाही पण त्यांच्या दादागिरीने आता ठाण्याच्या भाईंना मैदानात उतरावे लागले. कोणत्याही फाईली, विशेषत वित्त विभागाने नाकारलेले प्रस्ताव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांना नक्कीच कळलं असेल. एखाद्याला जेवायला आपले ताट द्यावे पण बसायला पाट देऊ नये. अशी खोचक म्हणत वापरून वडेट्टीवारांनी अजित पवारांसह मुख्यमंत्र्यांवरही टिका केलीय.
हेही वाचा…शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांना सुषमा अंधारे राखी बांधणार, म्हणाल्या, “किमान एक तरी..,”
दरम्यान, अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यापासून शिंदे गट तसेच भाजपमध्ये अस्वस्थता होती. त्यातच अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांत बैठका आणि काही निर्णयांचा धडाका लावताना मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांची नाराजी ओढावून घेतली होती. त्यामुळे अजित पवार यांच्या कारभाराला लगाम लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून यापुढे आपल्याकडे येणाऱ्या सर्व महत्वाच्या तसेच प्रसंगी वित्त विभागाने नाकारलेल्या फाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत आपल्याकडे पाठवाव्यात, असे आदेश शिंदेंनी दिले आहेत.
दादांच्या दादागिरीला भाईंचा लगाम!
अजित पवार मंत्रिमंडळात येऊन दोन महिने पण झाले नाही पण त्यांच्या दादागिरीने आता ठाण्याच्या भाईंना मैदानात उतरावे लागले
कोणत्याही फाईली, विशेषत वित्त विभागाने नाकारलेले प्रस्ताव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे… pic.twitter.com/zsZwuvf8VG
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“बंडखोरांना आगामी निवडणुकीत जागा दाखवली जाईल,” शरद पवारांनी अजित पवार गटाविरूद्ध दंड थोपटलं
हेही वाचा…पंतप्रधानपदाची इंडियाकडे अनेक पर्याय, पण भाजपात मोदींशिवाय पर्याय आहेत का ?
हेही वाचा…“इंडियाची बैठक झाली अन् गॅसच्या किमंती कमी झाल्या, कारण केंद्र सरकारचं गॅसवर,” ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी विरूद्ध अरविंद केजरीवाल, इंडियाच्या बैठकीपुर्वी आपची मोठी घोषणा
हेही वाचा…“ब्रम्हदेव जरी खाली आला तरी २०२४ पर्यंत मंत्रिपद घेणार नाही,” बच्चू कडूंचं मोठं विधान