पुणे : जोरदार पाऊस झाल्यानंतर काल आणि आज पुणे शहरात ठिकठिकाणी पाऊस साचलं. अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतुक व्यवस्थेवर देखील मोठा ताण पडला. यानंतर पुण्यातील रस्त्यावरून पाणी वाहत असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टिका केली.
“भर मांडवात नवरदेव हाकलून द्यावा अशी भाजपची अंधेरीच्या निवडणुकीत गत”
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील. असं म्हणत अजित पवार यांनी भाजपला सुनावलं.
” मग भाजपचं संस्कृत राजकाऱण कोल्हापुर अन् पंढरपुरच्या निवडणुकीत दिसलं असतं”
सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत. तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं आहे.
“राऊत साहेब.. तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे”; मनसेचा खोचक टोला
दरम्यान, राज्यात काल ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालं. अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचे लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी द्यावेत. असंही अजित पवार म्हणाले.
Read also
- “शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात हुकूमशाही रूजवू पाहत आहे का?”; काॅंग्रेसचा सवाल
- “माझ्या जीवाला काही झालं तर मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री जबाबदार”; सेनेच्या खासदाराचं पत्र
- अमोल मिटकरींनी बावनकुळे, शेलार, राणे, अन् सोमय्यांना डिवचलं..! म्हणाले, “तुमचा दिवाळी फराळ”
- “निवडणुका झाल्यावर आकड्यांचा जो दावा केला जातो त्याला अर्थ नाही”
- संजय शिरसाठ यांना ह्दयविकाराचा झटका..! मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना तात्काळ फोन