मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल अचानक त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईमध्ये आणण्यात आले आहे. ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना औरंगाबादहून तात्काळ मुंबईत दाखल कऱण्यात आले आहे.
“मी पुन्हा येईन, नंतर मी माघारी घेईन”; राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
गेल्या दोन दिवसापासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. संजय शिरसाठ यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांना छातीमध्ये दुखत होते. तसेच अस्वस्थ वाटत होतं. तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यांना बीपी कमी करण्याची औषध देण्यात आली. तसेच त्यांची प्रकृती स्थीर करण्यासाठी आवश्यक ते उपचार करण्यात आले असल्याची माहिती सिग्मा रूग्णालयातील डॉ. टाकळकर यांनी दिली.
“भाजपला राज ठाकरेंनी पत्र लिहिणे, हे स्क्रिप्टचाच भाग”,पोटनिवडणुकीवर राऊतांची प्रतिक्रिया
संजय शिरसाठ यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील सिग्मा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या तब्ब्येतीची विचारपुस करत डॉक्टांरांना चांगला उपचार करण्याची सुचना दिली आहे.
Read also
- “भर मांडवात नवरदेव हाकलून द्यावा अशी भाजपची अंधेरीच्या निवडणुकीत गत”
- ” मग भाजपचं संस्कृत राजकाऱण कोल्हापुर अन् पंढरपुरच्या निवडणुकीत दिसलं असतं”
- “राऊत साहेब.. तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे”; मनसेचा खोचक टोला
- गटविकास अधिकारी झाला गावाचा सरपंच..! आघाडी करत उधळला गुलाल
- “कार्यकर्त्यांनो आपली ऊर्जा पालिकेच्या निवडणुकीसाठी ठेवा”; शेलाराचं कार्यकर्त्यांना आवाहन