मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर आता विरोधी पक्षाकडून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. मात्र अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला उमेदवार माघारी घेतल्याचं घोषीत केलं. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
गटविकास अधिकारी झाला गावाचा सरपंच..! आघाडी करत उधळला गुलाल
अंधेरी पोटनिवडणुक आम्हीच जिंकणार असा दावा भाजपकडून केला जात होता. यामध्ये भाजपचे काही नेते मोठ्या आर्विभावाने सांगत होते. यावरूनच भातखळकर, बावनकुळे, शेलार, राणे, सोमय्या, आणि समस्त टीमला दिवाळी पर्वाच्या शुभेच्छा. आजची माघार कदाचित तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही. असं म्हणत अमोल मिटकरी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“कार्यकर्त्यांनो आपली ऊर्जा पालिकेच्या निवडणुकीसाठी ठेवा”; शेलाराचं कार्यकर्त्यांना आवाहन
त्यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले की, अखेर मशाल पेटली आहे. फटाकडे वाजायला अंधेरीतून सुरूवात झाली आहे. अंभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, आणि किरीट सोमय्या सातत्याने अंधेरीची पोटनिवडणुक आम्हीच जिंकणार असल्याचा दावा करीत होते. मात्र ऐनवेळी भाजपने माघार घेतल्याने आता ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
Read also
- “निवडणुका झाल्यावर आकड्यांचा जो दावा केला जातो त्याला अर्थ नाही”
- संजय शिरसाठ यांना ह्दयविकाराचा झटका..! मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना तात्काळ फोन
- “भर मांडवात नवरदेव हाकलून द्यावा अशी भाजपची अंधेरीच्या निवडणुकीत गत”
- ” मग भाजपचं संस्कृत राजकाऱण कोल्हापुर अन् पंढरपुरच्या निवडणुकीत दिसलं असतं”
- “राऊत साहेब.. तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे”; मनसेचा खोचक टोला