मुंबई : स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली होती. तेंव्हा या प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नांबाबात फक्त घोषणाच करण्यात आले होते. फक्त तोंडाची वाफ केली. विधानसभेत मोठ्या- मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल करण्यात आली आहे.
निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप
चार महिने उलटून गेले, तरी अजून लोकसेवा आयोगावर सदस्यांच्या नियुक्ती बाबत सरकार उदासीन आहे. २०१९ साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे अजूनही नियुक्तीसाठी झुरावं लागत आहे. कोरोना काळात लांबलेल्या परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचे वय वाढले आहे.
संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
त्यावर सरकारने वयोमर्यादा वाढविण्याची फक्त घोषणाच केली आहे. प्रत्यक्षात मात्र, कुठलीही अंमलबजावणी न करता बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या प्रस्थापितांनी फक्त पाने पुसली. MPSC ते आरोग्य विभागातील पदभरतीत गोंधळ घालणाऱ्या सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रति नियत साफ नाही, त्यांच्या हेतुवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करत आहेत,अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो.
पुण्यात 15 डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
जवळपास ३ आठवडे आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी २५ नोव्हेंबर रोजी आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. समितीचा अहवाल २० डिसेंबरला येणार आहे, २० डिसेंबरलाही निर्णय होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आंदोलनात जेवढे मिळते ते पदरात पाडून घ्यायचे आणि राहिल्यासाठी भांडायचे असते, असे म्हणत पगारवाढ झाल्यानंतर ते आंदोलनातून बाहेर पडले.
Read Also :
- रांगोळी, तोरणे… रिक्षावालेकाका, शिक्षक सर्वांचीच तयारी वाया गेली; भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची नाराजी
- दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी राष्ट्रवादीच्या जहाजात? योगेश कदमांना निर्माण होणार मोठे आव्हान
- हिवाळी अधिवेशन: पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील भास्कर जाधव नावाचं अस्त्र गाजणार का?
- कोल्हापूर जिल्हा बँक बिनविरोधीच्या उंबरठ्यावर ? पाहिलं पाऊल पुढे टाकत आमदार आवाडेंनी घेतला पुढाकार
- सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार नाईक प्रबळ दावेदार