पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. राज्यात पक्ष फुट प्रकरणानंतर महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. त्याआधीच आता जागावाटपावरून दोन्ही बाजूने मोठी चढाओढ दिसून येत आहे. यातच महायुती आघाडीत अजित पवार ९ जागांवर आग्राही असल्याचं दिसून आलं आहे. लोकसभेच्या ९ मतदारसंघासाठी आता अजित पवार गटाकडून संभाव्य यादी देखील समोर आली आहे.
हेही वाचा…बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटात राडा, ठाकरे अन् शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा असून यामध्ये बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहे. यापैकी फक्त रायगडचे खासदार सुनील तटकरे अजित पवार गटाकडे आहेत. तर या सर्व जागा सोडून अजित पवार गट, धाराशीव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा-गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, या पाच जागांसाठी आग्रही आहे.
हेही वाचा…“फडणवीस साहेब साचेबंद बोलणं बंद करा, तेच चेहरे, तेच मोहरे..,” सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
दरम्यान, अजित पवार गटाकडून बारामती लोकसभेच्या जागांसाठी सुनेत्रा पवार, सातारा लोकसभा मतदारसंघातून रामराजे निंबाळकर, रायगडमधून सुनील तटकरे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील, दक्षिण मुंबईमधून काॅंग्रेसमधील बडा चेहरा, परभणीतून राजेश विटेकर, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून प्रफुल्ल पटेल, धाराशिवमधून राणा जगजितसिंह तर छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांच्या नावाची सध्या सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पवारांनी उध्दवजींना सावध केलं की, मातोश्रीवर बॉम्बहल्ला करण्याचा कट..,’नारायण राणें’नी सांगितला थरारक किस्सा
हेही वाचा…भाजप, काॅंग्रेसमध्ये होणार काट्याची टक्कर, विधानसभेच्या ३०० जागांसाठी ‘या’ दोन राज्यांत आज मतदान
हेही वाचा…भाजपचं ठरलंय..! लोकसभा निवडणुक ‘या’ मुद्यावर लढवणार, जानेवारीच्या ‘या’ घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष ?
हेही वाचा…जालन्यात आज ओबीसींचा एल्गार, सभेसाठी कोण कोणते नेते येणार ? यादी आली
हेही वाचा…ठरलं तर मग..! माधुरी दिक्षीत लोकसभा निवडणुक लढवणार? भाजपमध्ये प्रवेश करणार ?