मुंबई : साहेबांच सगळं राजकारण बघितलं तर कुठे जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्व धर्म समभावाचं राजकारण केलं. पण हा पठ्ठ्या म्हणतो. जातीचं राजकारण केलं काय बोलावं आता,, अशा खाद दादा स्टाईलमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते इंदापुर च्या सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.
“निवडणुकीनंतर सेना प्रमुखांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आठवलं, आधी झोपले होते का?”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज्यातील राजकीय नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सरकार स्थापनेवरून जोरदार टीका केली. त्यानंतर राज्यातील विविध नेत्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाच्या बातम्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला तर..;
अजित पवार म्हणाले की, व्वा रं पठ्ठा… साहेबांचं सगळं राजकारण बघितलं तर कुठे जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्व धर्म समभावानं राजकारण केलं. परंतु हा पठ्ठा म्हणतो. जातीचं राजकारण केलं काय बोलावं आता. कुणीही सांगावं साहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. साहेबांचे पहिल्यापासून ते आता पर्यंतचे निर्णय काढून बघा ना. त्यामध्ये कुणीही दाखवावं. त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं. प्रत्येकवेळी त्यांनी सर्व धर्म समभाव हीच भूमिका ठेवून मार्गक्रमण केलं असंही त्यांनी म्हटंल आहे.
भाजपला सांगलीत मोठा धक्का! भाजपच्या माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश
दरम्यान, राज ठाकरे सध्या विरोधीपक्ष नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका करणे साहजिकच आहे. एरव्ही लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीसाने इतके बदलतील यांच मला कौतुक आणि आश्चर्य वाचत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाच्या निर्मितीनंतर जाती-पातीच्या राजकारणाला सुरूवात झाली. ते या गोष्टी आधीही बोलले आहेत. पवार साहेब गेली 55 महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहेत. त्याचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाही. त्यांच्या पक्षासाठी याची गरज आहे. असं राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळें यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
Read also:
- “मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल, पण भाजपचं गांडूळ निघालं”;
- “इडी काय राष्ट्रवादीचा पिच्छा सोडत नाही”; शिवसेनेच्या नेत्याची तक्रार अन् राष्ट्रवादी नेत्याच्या घरी इडी
- पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला
- भुजबळ, पिचड, अरूण गुजराथी हे कोणते नेते मग? राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या टिकेला पवारांचं प्रत्युत्तर
- राष्ट्रवादीमुळे जातीयवाद फोफावलाय; राज ठाकरेंचा शरद पवारांंवर निशाणा