पुणे: काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती तसेच कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनिषा कायंदे यांनी त्यांना चांगलचे धारेवर धरल आहे.
हे पण वाचा: ‘राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे’ – संजय राऊत
आमच्या लाडक्या अमृता फडणवीस यावेळी पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथं त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांना कोणतेही काम नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची प्रमुख प्रवक्तेपदी नेमणूक करावी,” असे मनिषा कायंदे म्हणाल्या.
हे पण वाचा: “वणवा पेटला रं…”, बैलगाडा बंदीविरोधात आढळराव पाटील उतरणार रस्त्यावर? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
पेडणेकर यांची अमृता फडणवीस यांच्यावर टीका
कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं सांगत त्यांनी हा विषय टाळला आहे. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगलं काम करत आहे. पण त्यांना दिलेलं काम योग्य पद्धतीनं केलं पाहिजे, असंही पेडणेकर म्हणाल्या.
Read Also :
- ‘ईडब्ल्यूएस’साठी घटनात्मक तरतूद शक्य मग मराठा आरक्षणासाठी का नाही? अशोक चव्हाण यांचा फडणवीसांना प्रश्न
- पुणेकरांच्या मदतीने कोरोनाची लढाई जिंकण्याचे बळ मिळाले: महापौर मुरलीधर मोहोळ
- चंद्रकांत पाटील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार, मनसे-भाजपच्या राजकारणाला मिळणार दिशा?
- मी घटनेनुसार काम करतोय, कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही – भगतसिंह कोश्यारी
- सर्व तयारी झाली, राज्यात महिनाभरात भाजपचे सरकार येणार आहे; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट