हिंगोली : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात सहावा दिवस आहे. आज ही यात्रा नांदेड जिल्हातून हिंगोली जिल्ह्यात जात आहे. यावेळी राहुल गांधी यांचे स्वागत लोकं वेगवेगळ्या गणवेशात करीत आहे. भारत जोडो यात्रा हिंगोलीत दाखल झाली तेव्हा तेथील सर्व नागरिकांनी लाल फेटे बांधून राहुल गांधींचं स्वागत केले. तसेच भारत जोडो यात्रेत कुस्तीचा फड देखील मांडण्यात आला. त्यामुळे याची चर्चा आता सर्वदुर होत आहे.
“राष्ट्रवादीची साथ सोडा सांगून कंटाळलो, अन् निर्णय घेतला”; किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमधून हिंगोली कडे जात असताना एका ठिकाणी कुस्तीचा फड मांडण्यात आला. तो पाहण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरक्षा कवचमधून बाहेर येत त्यांनी कुस्ती बघितली. यासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. तसेच यावेळी कोल्हापुरचा वारसा अभिमानाने मिरवणारे कोल्हापुरी फेटे सर्वांनी परिधान केले होते.
“फडणवीस काल म्हणाले की, द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे, अन् आज आव्हाडांना अटक”
तसेच राहुल गांधी यांना कोल्हापुरी संस्कृतीचे मानचिन्ह असणाऱ्या कुस्तीचा खेळ, लेझीमचे प्रात्यक्षिक देखील भारत जोडो यात्रेत बघायला मिळाली. कोल्हापुरचे काॅंग्रेसचे आमदार आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये राहुल गांधी कुस्तीची प्रत्याक्षिके बघताना दिसत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे हे फोटो देखील प्रचंड व्हायरल होत आहे.
Read also
- “महाराष्ट्राच्या हातून अजून एक प्रकल्प गेला, विरोधकांचा सरकारवर निशाणा
- “राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाही, अनेक नेते भाजप अन् शिंदे गटात येणार”
- किर्तीकरांनी पक्ष सोडला, राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले, “उद्यापासून लोक त्यांनाही…”;
- “आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात”; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य
- मग आता प्रश्न विचारल्यावर मिरच्या का झोंबतायत ? काॅंग्रेसचा तिखट सवाल