मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत ह्यदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यानंतर आता निवडणुक आयोगाने रमेश लटके यांचा मतदार संघ असलेल्या अंधेरी पुर्व मतदार संघासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप अशी रंगत बघण्याची शक्यता आहे.
“…तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही”; सेनेचा दुसरा टीझर व्हायरल
भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदीवारी देणार आहेत. भाजपने आपला उमेदवार दिला तर शिंदे गट या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण या निवडणुक चिन्हांचा न्यायालयात वाद सुरू असताना शिवसेना कोणत्या निवडणुक चिन्हांवर ही निवडणुक लढणार ते अजूनही स्पष्ट झालं नाही.
अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये रंगत.! शिंदे गटाची माघारी
गेल्या पाच ते सहा महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद आता निवडणुक आयोगाकडे गेला आहे. कोणत्याही राजकीय निवडणुक संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणुक आयोगाचा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाकडे जाणार त्यावर अजूनही आयोगाने निकाल दिला नाही. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुक उद्धव ठाकरे कोणत्या निवडणुक चिन्हांवर लढणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये रंगत.! शिंदे गटाची माघारी
दरम्यान, अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकसाठी उमेदवारांना 14 ऑक्टोबरपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे सध्या या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.
Read also
- “पडळकर तुम्ही ताटात जेवता की गोठ्यात? अन्न खाता की शेण?” राष्ट्रवादीचा पलटवार
- “बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस हा बहुजनांचा कर्दनकाळ”; गोपीचंद पडळकर
- “लक्षात ठेवा…! आम्ही बारीक लक्ष ठेऊन आहोत”; फडणवीसांचा इशारा
- भाजप-सेनेच्या लढाईत, राष्ट्रवादीचा सेनेला पाठिंबा..! अंधरी पुर्व पोटनिवडणुकीत रंगत येणार
- “मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन म्हणजे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न”