मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत मागील काही महिन्यात ह्दयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे अंधेरी पुर्व मतदारसंघात विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे आगामी सहा महिन्यात या मतदारसंघात पोटनिवणुक घेणे बंधणकारक असल्याने या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आता निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
“छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालोय, ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीय”
अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकसाठी उमेदवारांना 14 ऑक्टोबरपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे सध्या या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.
“एक तरफ दसरा, एक तरफ कचरा”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
या मतदारसंघात ही निवडणुकीत भाजप लढण्यासाठी इच्छुक असल्याने शिंदे गटाने ही निवडणुक न लढविण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजप विरूद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी रंगत होणार आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदीवारी देणार आहेत.
“अन्यथा सांगोल्याची जनता तुम्हाला मराठी बिग बॉस किंवा हास्यजत्रेत पाठवेल”
दरम्यान, पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपने अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे प्रभारी म्हणून आशिष शेलार यांच्या हस्ते भाजप निवडणुक प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले आहे.
Read also
- “माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग, जिथं लोक माझ्यावर बोलतात अन् मला ऐकावे लागते”; शरद पवार
- मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन…! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….;
- मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच..; शिंदे गटात जाण्याच्या चर्चेंना दिला फाटा
- “मला कोणीही रोखू शकत नाही”; धमकीच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- “नवाब मलिकांनी संजय राऊतांना तुरूंगात काय सांगितलं असेल..;” शिंदे गटाचा खोचक टोला