मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदेंना याआधी गडचिरोलीचे पालकमंत्री असताना जीवे ठार मारण्याची धमकीचा फोन आला होता. त्यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा आणखी तीव्रपणे सक्रिय झाल्या आहेत. यातच आता पुन्हा एकदा ये प्रकरण बाहेर आल्यानंतर गृहविभाग देखील सक्रिय झाला आहे. या प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“अन्यथा सांगोल्याची जनता तुम्हाला मराठी बिग बॉस किंवा हास्यजत्रेत पाठवेल”
सगळ्या धमकीच्या प्रकरणाची आम्ही दखल घेतली आहे. राज्यात घडणाऱ्या गोष्टींकडे आमचं लक्ष आहे. काल मुख्यमंत्र्यांना ज्यांनी धमकी दिली आहे. त्याला आम्ही पकडलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची सुरक्षिता आमच्यासाठी खुप महत्वाची असल्याने त्यांच्याकडे आमची पुर्ण नजर आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
“अजित दादांना काहीच काम राहिलं नाही, त्यांनी शिंदे, ठाकरे, इंदोरीकरांचं भाषणं ऐकावीत”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसह इतर बाबींवर गृहविगाची नजर असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. मात्र शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती खोटी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणाला अटक केली होती. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.
“तुमच्या अंगणामध्ये उगवलेल्या दोन धतुऱ्यांकडे लक्ष द्या”; सेेनेचं राणेंना सणसणीत प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. या धमक्यांंचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणुस आहे. मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात महिनाअगोदर धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर धमकीचा फोन देखील आला होता.
Read also
- मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच..; शिंदे गटात जाण्याच्या चर्चेंना दिला फाटा
- “मला कोणीही रोखू शकत नाही”; धमकीच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- “नवाब मलिकांनी संजय राऊतांना तुरूंगात काय सांगितलं असेल..;” शिंदे गटाचा खोचक टोला
- “छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालोय, ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीय”
- “एक तरफ दसरा, एक तरफ कचरा”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर हल्लाबोल