मुंबई : येत्या 5 ऑक्टोबरला राज्यात दसरा मेळाव्यानिमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेत आहे. तर तिकडे शिवाजी पार्क येथील मैदानावर उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार आहे. यातच उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे स्नेही आणि नेते मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चां रंगल्या होत्या. यावर आता त्यांनी सुचक ट्विट केलं आहे.
“अजित दादांना काहीच काम राहिलं नाही, त्यांनी शिंदे, ठाकरे, इंदोरीकरांचं भाषणं ऐकावीत”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक सुचक वक्तव्य केलं होतं. बाळासाहेबांची ज्यांनी सेवा केली ते चरणसिंह थापा हे देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यानंतर आता मिलिंद नार्वेकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार आहेत. असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण विविध चर्चेंनी भरून आलं होतं.
“तुमच्या अंगणामध्ये उगवलेल्या दोन धतुऱ्यांकडे लक्ष द्या”; सेेनेचं राणेंना सणसणीत प्रत्युत्तर
शिंदे गटातील अनेक नेत्यांनी मिलिंद नार्वेकर देखील शिंद गटात येणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे नार्वेकर देखील शिंदेंना पाठिंबा देणार अशी चर्चा रंगली होती. मात्र काल मिलिंद नार्वेकर यांनी सुचक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे. की 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपारीक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माॅं दुर्गेचे दर्शन घेतले. असं असं ट्विट करत त्यांनी शिंदे गटात जाण्याच्या चर्चेंना फाटा दिला आहे.
५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले. pic.twitter.com/hzhh2YBMai
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 3, 2022
Read also
- “मला कोणीही रोखू शकत नाही”; धमकीच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- “नवाब मलिकांनी संजय राऊतांना तुरूंगात काय सांगितलं असेल..;” शिंदे गटाचा खोचक टोला
- “छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालोय, ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीय”
- “एक तरफ दसरा, एक तरफ कचरा”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
- “अन्यथा सांगोल्याची जनता तुम्हाला मराठी बिग बॉस किंवा हास्यजत्रेत पाठवेल”