सांगली : राज्यात ज्याठिकाणी मेंढपाळ जातील तिथे त्यांना मारहाण होत आहे. काहीही कारण नसताना त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. धनगर समाजाचे सगळे विषय आता मी समजून घेत आहे. आता केवळ राजकीय विषय बाकी आहे. राजकारण आणि सत्ताकारणात तुम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचा वैचारीक शत्रू बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस आहे, हे लक्षात ठेवा. असं वक्तव्य भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
“माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग, जिथं लोक माझ्यावर बोलतात अन् मला ऐकावे लागते”; शरद पवार
गोपीचंद पडळकर यांनी अलिकडेच सांगली येथील आळेवाडी येथील दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी शऱद पवार यांच्यावर जहरी टिका करत शरद पवारांचा ऐकेरी उल्लेख केला आहे. तुम्हाला जर चांगल काम करायचं असेल तर ठासून काम करावं लागेल. वैचारीकपणे पुढे जावं लागेल. तसेच दसरा मेळावा हे काही राजकारणी लोकांचं काम नाही. तुम्ही सर्वांनी दरवर्षी एकत्र यायला हवं. असं म्हणत शरद पवार बहुजनांचा कर्दनकाळ आहे अशी टिका देखील त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन…! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….;
शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर राष्ट्रवादीने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचा स्वाभिमान, देशाचे नेते, पुरोगामी विचारांचे पाईक शरद पवार साहेबांचा विकृत शब्दात उपमर्द करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी आपल्या संघ संस्कृतीची ओळख करून दिली आहे. पडळकर तुम्ही ताटात जेवता की गोठ्यात? अन्न खाता की शेण ? हे तपासून पहावे, विरोधी विचारांचा आदर करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. नम्र व्हावे. माज जिरवण्याचा महाराष्ट्राचा मोठा इतिहास आहे. तो मोडून काढायला वेळ लागणार नाही. तेव्हा सावध असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच..; शिंदे गटात जाण्याच्या चर्चेंना दिला फाटा
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार कडून एसटी कामगारांना दसरा भेट काय देणार आहे? आता एस टी कामगारांनी पडळकरांच्या घरी दसरा दिवाळी साजरा करायला यायचं काय? राजकीय स्वार्थापोटी विरोधी पक्षाच्या नेत्यांना व्हिलन ठरवण्याचा गोपीचंद पडळकर यांचा डाव त्यांना महागात पडेल! असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Read also
- “लक्षात ठेवा…! आम्ही बारीक लक्ष ठेऊन आहोत”; फडणवीसांचा इशारा
- भाजप-सेनेच्या लढाईत, राष्ट्रवादीचा सेनेला पाठिंबा..! अंधरी पुर्व पोटनिवडणुकीत रंगत येणार
- “मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन म्हणजे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न”
- “…तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही”; सेनेचा दुसरा टीझर व्हायरल
- अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये रंगत.! शिंदे गटाची माघारी