मुंबई : येत्या दसरा मेळाव्याच्या दिवशी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. कारण 5 ऑक्टोबर ला राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, आणि राष्ट्रीय स्वंय संघ यांच्या सभा पार पडणार आहेत. यासाठी मोठी तयारी सुद्धा सुरू केली आहे. या सभांचे टीझर ही लॉंन्च करण्यात आले आहेत.
“नवाब मलिकांनी संजय राऊतांना तुरूंगात काय सांगितलं असेल..;” शिंदे गटाचा खोचक टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे. तर शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांचा मुंबईतच शिवाजी पार्क याठिकाणी सांयकाळी साडे सहा वाजता होणार आहे. तर भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सकाळी दहा वाजता होणार आहे. त्यामुळे त्यादिवशी राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
“छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालोय, ऐऱ्यागैऱ्याची औलाद नाहीय”
एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे.
“एक तरफ दसरा, एक तरफ कचरा”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
तर उद्धव ठाकरे यांच्या सभेचा दुसरा टिझर देखील लॉंन्च करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपतींनी आपल्याला शिकवलं कोणाच्या पाठीत वार करायचा नाही आणि जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही. असं म्हणत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
एक नेता, एक झेंडा, एक मैदान…
एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/xqM6444BbG— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 3, 2022
Read also
- अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये रंगत.! शिंदे गटाची माघारी
- “माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग, जिथं लोक माझ्यावर बोलतात अन् मला ऐकावे लागते”; शरद पवार
- मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन…! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….;
- मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच..; शिंदे गटात जाण्याच्या चर्चेंना दिला फाटा
- “मला कोणीही रोखू शकत नाही”; धमकीच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया