भंडारा : राज्यात 5 ऑक्टोंबर रोजी दसरा मेळावा होत असून या दिवशी राज्यात विविध राजकीय सभांचा पाऊस पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अन्, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभा होत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलाचं तापणार आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगला राहावा म्हणून गृहविभाग देखील सतर्क झाला आहे.
मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन…! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….;
यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलिसांना तशाप्रकारे सुचना देखील दिल्या आहेत. राज्यात दसरा मेळावा, धम्मचक्र प्रवर्तक दिन असे अनेक महत्वाचे कार्यक्रम होत असतात. पीएफआयच्या माध्यमातून काही प्रकार होत असतील, तर त्यावर गृहविभागाचे लक्ष आहे. योग्य ती खबरदारी आम्ही घेत आहोत. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच..; शिंदे गटात जाण्याच्या चर्चेंना दिला फाटा
अलिकडेच पीएफआयवर केंद्र सरकारने पाच वर्षाची बंदी घातली आहे. त्यानंतर त्याचे पडसाद पुण्यात देखील बघायला मिळाले. पीएफआयच्या संघटनेवर पाच वर्षाची बंदी घातल्यानंतर पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यात हिंसक गोष्टी घडू नये म्हणून गृहविभाग आणि पोलीस प्रशासन योग्य ती काळजी घेत असून त्यावर बारकारईनं लक्ष असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“मला कोणीही रोखू शकत नाही”; धमकीच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
दरम्यान, शेतकर्यांच्या कृषीवीजपंपाचा अनुशेष दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात 2 लाख सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत. भंडारा जिल्ह्याने सुद्धा कुसुम योजनेत लक्ष्य निर्धारित करण्यास सांगण्यात आले आहे. धानखरेदीत गेल्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. त्यामुळे आता अधिकार पालकमंत्र्यांकडे नाही, तर जिल्हाधिकार्यांकडेच असतील. धानखरेदीतील सर्व अटीशर्तींचे पालन, सॅटेलाईट सर्वेक्षण इत्यादी उपाय करण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत धानाला कुठलीही मदत झाली नाही. आता यासाठी एक उपसमिती तयार करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत त्याची बैठक घेऊन बोनसची पद्धत बदलून थेट शेतकर्यांच्या खात्यात पैसे देण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया तयार करणार आहे. असंही ते म्हणाले आहे.
Read also
- भाजप-सेनेच्या लढाईत, राष्ट्रवादीचा सेनेला पाठिंबा..! अंधरी पुर्व पोटनिवडणुकीत रंगत येणार
- “मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन म्हणजे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न”
- “…तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही”; सेनेचा दुसरा टीझर व्हायरल
- अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये रंगत.! शिंदे गटाची माघारी
- “माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग, जिथं लोक माझ्यावर बोलतात अन् मला ऐकावे लागते”; शरद पवार