मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत मागील काही महिन्यात ह्दयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे अंधेरी पुर्व मतदारसंघात विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे आगामी सहा महिन्यात या मतदारसंघात पोटनिवणुक घेणे बंधणकारक असल्याने या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आता निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भाजप आणि शिवसेनेत लढत असून राष्ट्रवादीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच..; शिंदे गटात जाण्याच्या चर्चेंना दिला फाटा
अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकसाठी उमेदवारांना 14 ऑक्टोबरपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे सध्या या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.
“मला कोणीही रोखू शकत नाही”; धमकीच्या फोननंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
या मतदारसंघात ही निवडणुकीत भाजप लढण्यासाठी इच्छुक असल्याने शिंदे गटाने ही निवडणुक न लढविण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजप विरूद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी रंगत होणार आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदीवारी देणार आहेत.
“नवाब मलिकांनी संजय राऊतांना तुरूंगात काय सांगितलं असेल..;” शिंदे गटाचा खोचक टोला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरी पुर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपला पाठिंबा कुणाला राहणार असं विचारण्यात आल्यानंतर शरद पवारांनी लगेच उत्तर दिलं. राष्ट्रवादीची ताकद आम्ही शिवसेनेच्या पाठीमागे उभी करू, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपने अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे प्रभारी म्हणून आशिष शेलार यांच्या हस्ते भाजप निवडणुक प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले आहे.
Read also
- “मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन म्हणजे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न”
- “…तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही”; सेनेचा दुसरा टीझर व्हायरल
- अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये रंगत.! शिंदे गटाची माघारी
- “माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग, जिथं लोक माझ्यावर बोलतात अन् मला ऐकावे लागते”; शरद पवार
- मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन…! फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….;