पुणे : पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवारांना मिळावं, यासाठी अजित पवार गट आग्रही होतं. यातच आता काही दिवसापासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले अन् दुसऱ्या दिवशी शिंदेंनी पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली. यामध्ये पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवारांकडे देण्यात आले. यावरून आता राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी चंद्रकांत पाटलांना डिवचलं आहे.
हेही वाचा…पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार, आरोपीने नगरसेविकेकडून दहा लाख रूपयेही उकळले
चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले हे. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलं आहे. यावरून आधी महत्वाची खाती काढली आणि आता पुण्याचं पालकमंत्री पदही काढून घेण्यात आलं. मोठमोठ्या तब्बल आठ खात्याचं मंत्रिपद सांभाळण्याचा अनुभव असलेल्या चंद्रकांत दादांचं डीमोशन बघवत नाही हो. असं म्हणत अनिल देशमुख यांनी चंद्रकांत पाटील यांनी डिवचलं आहे.तसेच चंद्रकांत दादा आणखी किती दिवस हा अन्याय सहन करणार असा खोचक टोलाही त्यांनी हाणला.
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली, जागा वाटपासाठी समिती स्थापन, ‘या’ नेत्यांचा समावेश
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर चंद्रकांत पाटलांकडे महत्वाची खाती देण्यात आली. परंतु अजित पवार यांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडील खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे देण्यात आली. आता पुण्याचं पालकमंत्री पदही अजित पवारांकडे देण्यात आल्याने चंद्रकांत पाटलांची चर्चा जोरदार सुरू आहे.
आधी महत्त्वाची खाती काढली आणि आता पुण्याचं पालकमंत्री पद…
मोठमोठ्या तब्बल आठ खात्याचं मंत्रीपद सांभाळण्याचा अनुभव असलेल्या चंद्रकांत दादांच डीमोशन बघवत नाही हो, चंद्रकांत दादा आणखी किती दिवस हा अन्याय सहन करणार❓❓@ChDadaPatil
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो”, मित्र पक्षाचा गंभीर आरोप
हेही वाचा… रोहित पवारांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’ने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणणार, १३ जिल्ह्यातून जाणारी यात्रा भाजपच्या महाविजय २०२४ ला खिंडार पाडत जाणार
हेही वाचा…“५६ वर्षात शरद पवार एकही निवडणुक हरले नाहीत, ” सुप्रिया सुळेंनी सांगितलं रहस्य, म्हणाल्या..,
हेही वाचा…आली समीप घटिका..! एकनाथ शिंदें दिल्लीला तात्काळ रवाना
हेही वाचा…शरद पवार गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार, शरद पवारांची रणनीती तयार