नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या पक्ष फुट प्रकरणानंतर आता प्रथमच निवडणुक आयोगात उद्या सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि पक्षनाव याबाबत निवडणुक आयोग उद्या निकाल देणार आहे. त्याआधी शरद पवार गटाची राष्ट्र कार्यकारणीची बैठक दिल्लीत होत असून कार्यकारिणीत शरद पवार मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…आमदारांना ५००-५०० कोटींचा निधी, आरोग्य व्यवस्थेला ५० कोटी दिले असते तर आज शेकडो जीव वाचले असते
निवडणुक आयोगात उद्या सुनावणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यातील खासदार, आमदार आणि राष्ट्रीय सदस्य उपस्थित राहणार आहे. याआधीच शरद पवार यांचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर मोठमोठे पोस्टर कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहे. उद्या अकरा वाजता दिल्तील कार्यकारिणीचं आयोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा…मुंबईतील सहापैकी ‘या’ तीन जागांवर काॅंग्रेस आग्रही, लोकसभेच्या जागा वाटपावरून ठाकरे अन् काॅंग्रेसमध्ये संघर्ष होणार
दरम्यान, निवडणुक आयोगात उद्या दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी निवडणूक चिन्ह प्रकरणात सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहे. यातच शरद पवार गटाकडून ८ ते ९ हजार तर अजित पवार गटाकडून ३ हजार शपथ पत्र शपथपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुक आयोगाने चिन्ह गोठवल्यास पुढची रणनीती काय असणार याबाबत आजच्या बैठकीत मंथन केले जाणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार, आरोपीने नगरसेविकेकडून दहा लाख रूपयेही उकळले
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली, जागा वाटपासाठी समिती स्थापन, ‘या’ नेत्यांचा समावेश
हेही वाचा…शरद पवारांना सर्वात मोठा धक्का..! राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराचं लोकसभेतून निलंबन
हेही वाचा…“एक नाही तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही”, बच्चू कडूंचं थेट भाजपलाच आवाहन
हेही वाचा…अजित पवारांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, फटाके फोडत कार्यकर्त्यांचा जल्लोष