पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ पालकमंत्री पदाची सुधारीत यादी आज जाहीर केली आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत, पेढे वाटत जल्लोष साजरा करण्यात आला.
हेही वाचा…“शासनाकडून बड्या वकिलांची केस उभी केली जाणार,” बारामती अॅंग्रोबाबत रोहित पवारांचं मोठं भाकित
मागील काही दिवसापासून पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण झाला होता. यातच अजित पवार नाराज असल्याच्याही बातम्या समोर आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ दिल्लीहून जाऊन आल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. यामध्ये राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांकडे विविध जिल्हासाठी पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांना पालकमंत्री मिळालं, पण ‘या’ दोन जिल्ह्यासाठी अजित पवारांची ताकद पडली कमी
दरम्यान, अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पुण्यातील नीरा आणि पिंपरे या गावांमध्ये आज राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून आणि एकमेकाल पेढे वाटून जल्लोष साजरा केला तर पिंपरी चिंचवड मध्ये देखील अजित पवार समर्थकांनी पेढे वाटून आंनद साजरा केला.
READ ALSO :
हेही वाचा…आमदारांना ५००-५०० कोटींचा निधी, आरोग्य व्यवस्थेला ५० कोटी दिले असते तर आज शेकडो जीव वाचले असते
हेही वाचा…मुंबईतील सहापैकी ‘या’ तीन जागांवर काॅंग्रेस आग्रही, लोकसभेच्या जागा वाटपावरून ठाकरे अन् काॅंग्रेसमध्ये संघर्ष होणार
हेही वाचा…दादा भुसेंनी नाशिकचा गड राखला, भुजबळांनी थेट संख्याबळच दाखवलं, पालकमंत्री पदावरून तिढा कायम
हेही वाचा…पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण भरत गोगावलेंना संधी नाहीच, गोगावले म्हणाले की, “देवीच्या मनात असेल तर..,”
हेही वाचा…“खोके सरकार म्हणजे अजित पवार पण त्यात आहेत का?”शिंदेंच्या मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना सवाल