रायगड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ पालकमंत्री पदांची यादी जाहीर केली, परंतु सातारा, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा असूनही तसाच आहे. पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवारांना मिळालं, परंतु या तिन जिल्ह्यात शिंदे गट आणि राष्ट्रवादीत मोठी चढाओढ निर्माण झाली आहे. यातच मंत्रिपदासाठी आशा लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
हेही वाचा…“लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा व्हा,” शरद पवारांच्या ‘या’ भिडूकडून अजित पवारांना आवाहन
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांना मिळावं, यासाठी अजित पवार गट आग्रही आहे. रायगड जिल्ह्यात आमदार खासदार राष्ट्रवादीचे जास्त असल्याने पालकमंत्री पद राष्ट्रवादीलाच मिळावं अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका आहे. परंतू शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले अद्यापही पालकमंत्रीसाठी आशा लावून बसले आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाकडून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, नार्वेकरांनी ठाकरे गटावर केलेत अप्रत्यक्ष आरोप
रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे योग्य निर्णय घेतील. रायगड सध्या उदय सामंतांकडे आहे म्हणजे आमच्याकडेच आहे. त्यामुळे अचडणीची बाब नाही आहे. उदय सामंतांकडे पहिल्यापासूनच रायगडचं पालकमंत्री आहे. जोपर्यंत आमची वर्णी लागत नाही तोपर्यंत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे राहील असं गोगावले म्हणाले.
हेही वाचा…लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुकानंतरच होणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर
यातच पालकमंत्रीपदाबाबत विचारले असता भरतशेठ गोगावले म्हणाले की, मी मंत्रीच झालो नाही तर पालकमंत्री कसा होणार? मंत्रिपद मिळेपर्यंत पालकमंत्रीपद राखून ठेवलेलं आहे. विचारविनिमय सुरू आहे. योग्य तेच घडेल. नवरात्रीमध्ये देवीच्या मनात असेल तर तेच घडेल. माझ्यासाठीच पालकमंत्रीपदाबाबत निर्णय झाला नसून ते पद राखून ठेवलंय. असंही त्यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेली ११ पालकमंत्री पदाची सुधारीत यादी
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
READ ALSO :
हेही वाचा…“घाण तर महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी केलीय, २०२४ मध्ये नक्कीच साफ होईल” , कुणी केली टिका ?
हेही वाचा…“खोके सरकार म्हणजे अजित पवार पण त्यात आहेत का?”शिंदेंच्या मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
हेही वाचा…“शासनाकडून बड्या वकिलांची केस उभी केली जाणार,” बारामती अॅंग्रोबाबत रोहित पवारांचं मोठं भाकित
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांना पालकमंत्री मिळालं, पण ‘या’ दोन जिल्ह्यासाठी अजित पवारांची ताकद पडली कमी
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित दादांकडे पुण्याचे पालकमंत्री पद, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी