मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एकनाथ शिंदे यांचा जर्मनी व ब्रिटन दौरा, राहूल नार्वेकर यांचा घाना, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दावास दौऱ्यावरच्या खर्चावरून आदित्य ठाकरेंनी टिका केली होती. यावर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा…लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुकानंतरच होणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर
परदेश दौऱ्याबाबत ठाकरेंनी ट्विट केल्यानंतर नेत्यांनी परदेश दौरे रद्द केल्याचं ठाकरेंनी म्हटलं होतं. यावर आता २०२२ च्या दावोस दौर्यावर जाण्यासाठी तत्कालीन ऊर्जा मंत्री यांचा विमान, वाहन आणि हॉटेल खर्च कुणी केला? तत्कालीन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री यांचा विमान खर्च, वाहन खर्च आणि हॉटेल खर्च कुणी केला? मंत्री पर्यावरण आणि पर्यटन यांचे OSD यांचा विमान खर्च ,वाहन खर्च आणि हॉटेल खर्च कुणी केला? असा सवाल उदय सामंतांनी ठाकरेंना केले आहेत. यातच वरील दौरा स्वखर्चाने केला असेल तर खरच अभिनंदन असा टोलाही उदय सामंतांनी ठाकरेंना लगावला.
हेही वाचा…लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, अन् काॅंग्रेस आणि भाजपमध्ये भांडण, पाहा नेमकं काय घडलं ?
दरम्यान, दावोसला झालेल्या ऊर्जा विभागाच्या MOU चे काय झाले? दावोसला MOU झालेल्या Sinaramas प्रकल्पासाठी कॅबिनेट कमिटी का झाली नाही? खोके सरकार म्हणजे अजित पवार पण त्यात आहेत का? असा खोचक सवालही त्यांनी केला. त्याचबरोबर आदरपूर्वक विनंती ज्यांच्या कोणाच्या मनात संबधित प्रश्न असतील त्यांनी कृपया खुलासा करावा. रागावू नये. पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस,पवार सरकार वर टीका करण्यासाठी शुभेछा असंही त्यांनी म्हटलं.
*काही प्रश्न अनुत्तरित*..
1)२०२२ च्या दावोस दौर्यावर जाण्यासाठी तत्कालीन ऊर्जा मंत्री यांचा विमान, वाहन आणि हॉटेल खर्च कुणी केला???
2)तत्कालीन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री यांचा विमान खर्च, वाहन खर्च आणि हॉटेल खर्च कुणी केला???
3)मंत्री पर्यावरण आणि पर्यटन यांचे OSD यांचा विमान…— Uday Samant (@samant_uday) October 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शासनाकडून बड्या वकिलांची केस उभी केली जाणार,” बारामती अॅंग्रोबाबत रोहित पवारांचं मोठं भाकित
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांना पालकमंत्री मिळालं, पण ‘या’ दोन जिल्ह्यासाठी अजित पवारांची ताकद पडली कमी
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित दादांकडे पुण्याचे पालकमंत्री पद, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी
हेही वाचा…“लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा व्हा,” शरद पवारांच्या ‘या’ भिडूकडून अजित पवारांना आवाहन
हेही वाचा…ठाकरे गटाकडून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, नार्वेकरांनी ठाकरे गटावर केलेत अप्रत्यक्ष आरोप