पुणे : राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून अजित पवारांनी भाजप-शिंदे गटाच्या महायुतीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शरद पवारांनी एनडीएत सहभागी व्हावं, यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आलेत. परंतू शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. यातच अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत यावे, असं पुणे जिल्ह्याचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…अजित पवारांची नाराजी, भाजपचा अजित दादांना पाठिंबा, पण शिंदेंची आडकाठी, दिल्लीत काय झालं ?
अजित पवारांनी पुन्हा शरद पवारांसोबत यावे, अजित पवार पुन्हा आले तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. त्यांनी राष्ट्रवादीत यावं हा त्यांचा निर्णय आहे. मी त्यांना सल्ला देण्याइतका मोठा नाही. परंतु ते आले तर आनंद होईल असं प्रशांत जगताप म्हणाले. तसेच लांडग्यांच्या युतीत जाऊन वाघाला समाधान लाभत नाही, तो अस्वस्थच असतो. पोटाची खळगी भरते पण रुबाब आणि आदर जातो. लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा होण्याची संधी वाघाकडे कायम असते. असं ट्विट देखील सकाळी जगतापांनी केले होते.
हेही वाचा…फ्लेक्सबाजी करून शहराचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी पुनीत बालन यांना दणका, तातडीने ३ कोटी २० लाख भरण्याचे आदेश
दरम्यान, राष्ट्रवादीच्या विरोधात बंडाळी केल्यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीवरच दावा सांगितला. आता यासंदर्भात राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटाने निवडणुक आयोगात धाव घेतली आहे. यातच आता राष्ट्रवादी पक्ष नाव आणि चिन्ह यासंदर्भात निवडणुक आयोगात सुनावणी होणार आहे. त्याआधी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना साद घातली जात आहे.
लांडग्यांच्या युतीत जाऊन वाघाला समाधान लाभत नाही, तो अस्वस्थच असतो. पोटाची खळगी भरते पण रुबाब आणि आदर जातो. लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा होण्याची संधी वाघाकडे कायम असते.
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) October 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाकडून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, नार्वेकरांनी ठाकरे गटावर केलेत अप्रत्यक्ष आरोप
हेही वाचा…लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुकानंतरच होणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर
हेही वाचा…लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, अन् काॅंग्रेस आणि भाजपमध्ये भांडण, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…टॉयलेट साफ करायला लावणं महागात पडलं, शिंदेंच्या ‘या’ खासदारवर गुन्हा दाखल
हेही वाचा…अजून किती तारखा…? शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी आणखी लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार सुनावणी